अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन डबल मर्डर प्रकरणातून निर्दोष मुक्त
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची डबल मर्डर प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. छोटा राजनचे वकील ॲड. तुषार खंदारे यांनी याची माहिती दिली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचा हा निकाल दिला २९ जुलै २००९ रोजी छोटा शकील गँगचे गुंड असिफ दाढी आणि शकील मोडक या दोघांची जे जे सिग्नलजवळ हत्या करण्यात आली होती. छोटा राजन याच्या गुंडांनी हे हत्याकांड घडवल्याचा आरोप करण्यात आला होता. या हत्याकांडात छोटा राजनलाही आरोपी करण्यात आले होते. मात्र, पुराव्यांअभावी सोमवारी विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायधीश अरविंद वानखेडे यांनी छोटा राजनला डबल मर्डरच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.