इचलकरंजी : शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त ‘कापड जत्रा’
लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिलमध्ये 7, 8 व 9 मेदरम्यान जिल्ह्यात तयार होणार्या कापडाचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी ‘कापड जत्रा’ भरवण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त कापड (cloths) उत्पादकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केले आहे.
2022 हे वर्ष राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. यानिमित्त ‘कापड जत्रा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 3 मीटर बाय 3 मीटरचे स्टॉल विनाशुल्क उपलब्ध करण्यात आले आहेत. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत स्टॉल सुरू ठेवण्यास परवानगी आहे. भरघोस डिस्काऊंट देऊन उत्पादनांची विक्री करावी, हा मुख्य उद्देश यामागे आहे. त्यामुळे इचलकरंजी परिसरातील कापड (cloths) उत्पादक, विक्रेत्यांनी याचा लाभ घ्यावा.