उन्हाळ्यात टॅलकम पावडर वापरताय? मग जरा सांभाळून!
टॅल्कम पावडरही (talcum powder) आपल्याला घराघरात पाहायला मिळेल. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोक पावडरचा वापर करतात, त्यात आता उन्हाळा सुरु झाला आहे, म्हटल्यावर बरेच लोक घामापासून संरक्षण मिळण्यासाठी टॅल्कम पावडरचा वापर करतात. त्यात उन्हाळा सुरु झाला की, बऱ्याच अशा टॅल्कम पावडरच्या जाहिराती येतात. ज्या आपल्या शरीराला या उष्णतेत थंड ठेवण्यासाठी काम करतात. तुम्हाला माहितीय का की, टॅल्कम पावडर कशी तयार होते?
तांत्रिकदृष्ट्या, टॅल्कम हे मातीतील एक मिनरल किंवा खनिज आहे, जे खाणकाम करून काढले जाते. हे फक्त स्किन पावडर म्हणून वापरले जात नाही, तर लिपस्टिक, मस्करा, फाउंडेशन, ब्लश, आय शॅडो यांसारख्या विविध कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये मिसळले जाते.
एवढेच नाही तर टॅल्कम पावडरचा वापर फूड प्रोसेसिंग आणि अनेक सप्लिमेंट्स बनवण्यासाठीही केला जातो. टॅल्कम पावडरचा वापर औषधे, च्युइंगम, पॉलिश केलेले तांदूळ, खेळणी इत्यादींमध्येही केला जातो.
परंतु तुम्हाला माहितीय का की टॅल्कम पावडरमुळे तुमच्या शरीराला नुकसान देखील होऊ शकते. टॅल्कम पावडर हे मुरुम, पुरळ येण्याचे कारण आहे.
घाम आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी आपल्या देशात टॅल्कम पावडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण त्याच्या फायद्यापेक्षा त्याचे तोटेच जास्त आहेत. टॅल्कम पावडर त्वचेचे छिद्र बंद करते. परंतु तुम्हाला माहितीय का की वैद्यकीयदृष्ट्या ही छिद्रे खुली राहिली पाहिजेत.
टॅल्क हे एक प्रकारचे रसायन आहे, ज्यामध्ये मॅग्नेशियम, सिलिकेट इ. असतात. आणि घामामध्ये सोडियम असल्यामुळे ते सोडियम हे मॅग्नेशियम, सिलिकेट इत्यादी शोषून घेते, म्हणजेच काय तर या रसायनामुळे आपल्याला घाम शोषून घेण्यात मदत होते आणि अंगाला जास्त घाम येत नाही.
आता आपण शरीरशास्त्राचा विचार केला, आपल्या उष्णता जाणवत असेल, तर जास्त घाम येतो, तसेच जर थंडी वाजत असेल,तर कमी घाम येतो.
पण जेव्हा आपण टॅल्कम पावडर (talcum powder) वापरतो, तेव्हा ते छिद्रांना ब्लॉक करते. ज्यामुळे महिलांमध्ये मुरुम, पुरळ इत्यादी समस्या उद्भवतात.
लहान मुलांसाठी टॅल्कम पावडर चांगली की वाईट?
तज्ज्ञांच्यामते लहान मुलांना या टॅल्कम पावडरचा जास्त धोका आहे. ज्यामुळे ते लहान मुलांसाठी टॅल्कम पावडरची शिफारस करत नाही. वास्तविक, मुलांना टॅल्कम पावडरची अजिबात गरज नसते. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या साबणाची गरज नसते. लहान मुलांना स्वच्छ ठेवण्यासाठी फक्त कोमट पाण्याने अंघोळ घातली जाऊ शकते.
अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने देखील मुलांना टॅल्कम पावडर न वापरण्याचा सल्ला दिला आहे. टॅल्कम पावडरमुळे मुलांमध्ये श्वसनाचे आजार होऊ शकतात, असे अकादमीचे मत आहे.
परंतु भारतात मात्र टॅल्कम पावडरचा लहान मुलांसाठी बिंधास्त वापर केला जात आहे.
यामुळे गर्भाशयाला कर्करोगाचा धोका
टॅल्कम पावडरचा संबंध गर्भाशयाच्या कर्करोगाशी आहे. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्या स्त्रिया त्यांच्या जननेंद्रियाच्या भागात टॅल्कम पावडर वापरतात त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता जास्त असते.
नुकतीच एक केस यूएस कोर्टात गेली ज्यामध्ये 22 महिलांनी तक्रार केली की, त्यांना एका विशिष्ट कंपनीची टॅल्कम पावडर वापरल्यानंतर गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे. यावर अद्याप सुनावणी सुरू आहे.