मुंबई-पुण्यासह Swiggy ने पाच शहरांत बंद केली

ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) कंपनी असलेल्या स्विगीनं (Swiggy) देशभरातील पाच प्रमुख शहरांमधील सुपर डेली सर्व्हिस (Super Daily Service) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगीच्या सुपर डेली सर्व्हिस अंतर्गत, दूध, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू (Daily Essential) आणि किराणा सामानाची (Groceries) डिलिव्हरी दिली जाते. ही सर्व्हिस सबस्क्रिप्शनवर (Subscription) आधारित आहे. म्हणजेच ग्राहकांना ही सर्व्हिस मिळवण्यासाठी अगोदर सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. या सर्व्हिसमुळे स्विगीला तोटा होत असल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. या आव्हानात्मक काळात आपला खर्च आणि तोटा कमी ठेवण्यावर कंपनी भर देत आहे. कंपनी अद्याप या सर्व्हिसमधून नफा मिळवू शकलेली नाही. या शहरांत मुंबई-पुण्यासह पाच शहरांचा समावेश आहे.
ज्या शहरांमध्ये स्विगीची सुपर डेली सर्व्हिस बंद झाली आहे, त्यामध्ये दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR), मुंबई (Mumbai), चेन्नई (Chennai), पुणे (Pune) आणि हैदराबादसारख्या (Hyderabad) मोठ्या शहरांचा समावेश आहे. 12 मे 2022 पासून या शहरांमध्ये सुपर डेली सर्व्हिस मिळणार नाही. कंपनीनं 10 मे पासून नवीन ऑर्डर्स घेणं बंद केलं आहे. ज्या कस्टमर्सच्या वॉलेटमध्ये (Wallet) पैसे शिल्लक आहेत त्यांना ते परत केले जातील. सर्व्हिस बंद झाल्यानंतर पाच ते सात बिझनेस डेजमध्ये कस्टमर्सच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

देशातील काही कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये स्विगीनं सुपर डेली सर्व्हिस बंद केली असली तर बेंगळुरूमधील (Bengaluru) ही सबस्क्रिप्शन सर्व्हिस पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. स्विगीचे सह-संस्थापक आणि सुपर डेलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) फानी किशन एडेपल्ली (Phani Kishan Addepalli) यांनी सांगितलं की, ‘बिझनेस रिकन्स्ट्रक्शनचा एक भाग म्हणून काही शहरांमध्ये ही सर्व्हिस बंद केली जात आहे. त्यासाठी डिटेल प्लॅन तयार करण्यात आला आहे. मात्र, बेंगळुरूमध्ये ही सर्व्हिस वाढवण्यासाठी दुहेरी प्रयत्न केले जातील.’
या संदर्भात फानी किशन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मेल पाठवला आहे. मेलमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘आपण आता कस्टमर्सच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनलो आहोत. असं असूनही दुर्दैवानं अद्याप आपल्याला नफा (Profit) मिळवता आलेला नाही. त्यामुळे आपण आता आपल्याला बिझनेस टारगेटपासून दूर नेणाऱ्या सर्व्हिसवर वेळ आणि पैसे खर्च करणं बंद करत आहोत.’

पुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, मार्केटमध्ये स्वतःचं वेगळं आणि भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी, आपण स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आपण अशा प्रकारचे बदल केले पाहिजेत ज्यामुळे आपल्याला आपलं टारगेट (Target) अचिव्ह करण्यात मदत होईल. आयआयटी बॉम्बेतील ग्रॅज्युएट श्रेयस नागदवणे आणि पुनीत कुमार यांनी 2015 मध्ये सुपर डेलीची सुरुवात केली होती. सप्टेंबर 2018 मध्ये स्विगीनं ती टेक ओव्हर केली होती.

सुपर डेली सर्व्हिस बंद करण्याच्या स्विगीच्या या निर्णयामुळे त्यांच्या कस्टमर्सना मोठा फटका बसणार आहे. त्यांना आता पर्यायी सर्व्हिस शोधावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *