र्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्यात खरंच दुरावा ?

मराठी स्टारकास्टमध्ये सर्वांत लोकप्रिय कपल असलेल्या आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये दुरावा निर्माण होत असल्याच्या बातम्या येत आहेत. कुजबूज वाढली असतानाच आता आणखी एका कारणाने चाहते चिंतेत पडले असून ते अंदाज लावत आहेत.

Ravindra Jadeja : रविंद्र जडेजा सीएसकेला देणार सोडचिठ्ठी? दुस-या संघात जाण्याची शक्यता
उर्मिलाने अलीकडेच टीव्ही पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तुझेच मी गीत गात आहे च्या माध्यमातून ती पडद्यावर पुन्हा दिसत आहे. तिने पुनरागमन करण्यासाठी स्वत:च्या पतीच्या प्रॉडक्शन हाऊसचा मार्ग सोडून दुसरा निवडल्याने त्यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये आणखी चर्चेला भर मिळण्याचे कारण म्हणजे आदिनाथने उर्मिलाला वाढदिनी शुभेच्छा दिल्या नव्हत्या. त्यामुळे चाहतेही बरेच नाराज झाल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांच्यामध्ये सध्या काय घडत आहे याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.दोघांमधील दुराव्याची चर्चा होत असताना आता नवीन एक कारण समोर आलं आहे. आता उर्मिलाने आदिनाथला इन्स्टावर अनफॉलो केल्याची चर्चा रंगली आहे. कारण उर्मिला फॉलो करत असलेल्यांच्या यादीत आदिनाथचे नाव नसल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे आदिनाथ कोठारे उर्मिलाला फॉलो करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *