सांगली जिल्ह्यात घडली हृदयद्रावक घटना
(local news) नदीत पोहायला गेलेल्या कवठेपिरान (ता. मिरज) येथील युवराज महादेव ऐडके (वय 10) या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. गावातील वारणा नदीत गुरुवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.
युवराज याला पोहायला येत नव्हते. गेल्या चार दिवसापासून तो पोहायला जाण्याचा हट्ट करीत होता. कुटुंबातील लोकांनी त्याला जाण्यास विरोध केला होता. गुरुवारी सकाळी तो घरातील लोकांची नजर चुकवून वारणा नदीत पोहायला गेला होता. युवराज थेट पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. हा प्रकार काही मुलांनी पाहिला. काही तरुणांनी युवराजचा शोध घेतला. त्याला बाहेर काढून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तो मृत झाल्याचे सांगितले. (local news)