आम्ही चॅलेंज स्वीकारलं; …तुम्हालाही त्याच मातीत गाडणार”: संजय राऊत
मशिदींवरील भोंग्यांवरुन वातावरण तापलेलं असतानाच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (akbaruddin owaisi) हे गुरुवारी औरंगाबादेत आले आणि त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन शिवसेनेसोबतच इतर राजकीय पक्षांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर थेट ओवैसींना इशाराच दिला आहे. तुम्हालाही त्याच कबरीत गाडणार असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही. संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. यातून जर महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असं काही तरी राजकारण ओवैसींचं दिसत आहे. मी इतकंच सांगेन की, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली. त्याला कबरीत आम्ही टाकलं. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मुघल राजा. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पडत आहात… कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल.औरंगजेब हा महान संत नव्हता तो एक आक्रमक होता. महाराष्ट्रावर त्याने आक्रमण केलं. महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे त्याने उद्वस्त केली. आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडायचं… हे महाराष्ट्राला चॅलेंज देण्यासारखं आहे. ठिक आहे आम्ही चॅलेंज स्वीकारलं. औरंगजेबाला याच मातीत आम्ही गाडलं होतं. औरंगजेबाचे भक्त आहेत जे राजकारण करत आहेत त्याचीही तिच अवस्था होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. याच पार्श्वभूमीवर औवेसींनी राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अतिशय टोकाच्या शब्दांमध्ये टीका केली.
“कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या. कुत्र्याचं काम भुंकण्याचं आहे. वाघाचं काम शांतपणे चाललं जाणं आहे. बस भुंकू द्या. काहीच गरज नाही. वेळ आणि परिस्थीला समजा. त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाहीय. ते जाळ गुंफत आहेत. ते तुम्हाला जाळ्यात फसवू इच्छित आहेत. तुम्ही फसू नका”, असा घणाघात अकबरुद्दीन ओवेसी यांनी केला.