ठाकरे कुटुंबावर शोककळा;

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आत्त्या संजीवनी करंदीकर (Sanjeevani Karandikar) यांचे पुण्यात निधन झालं आहे. संजीवनी करंदीकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. सकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली असून पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

संजीवनी करंदीकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या सख्ख्या बहीण होत्या. त्या 84 वर्षांच्या होत्या. संजीवनी करंदीकर यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात सेक्शन अधिकारी म्हणून काम केलं होतं. त्या पुण्यात वास्तव्यास होत्या. संजीवनी करंदीकर यांच्या निधानामुळे ठाकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच शिवसैनिकांमध्येही शोककळा पसरली असून सर्वजण संजीवनी करंदीकर यांना श्रद्धांजली वाहत आहेत.थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या सुकन्या, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आत्या श्रीमती संजीवनी करंदीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली… परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्रदान करो!💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 थोर समाज सुधारक प्रबोधनकार केशवराव सिताराम ठाकरे यांची कन्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे यांची आत्या श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे आज वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले.संजीवनी करंदीकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे हे पुण्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या एकूण अपत्यांपैकी संजीवनी करंदीकर या एकच्याच हयात होत्या. आज त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. संजीवनी करंदीकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान बहीण होत्या. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर प्रसारमाध्यमांनी संजीवनी करंदीकर यांची मुलाखत घेतली होती आणि त्यावेली त्यांनी उद्धव ठाकरेंच्याबाबत अनेक किस्से सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *