RCB च्या खेळाडूचा जीवघेणा शॉट, स्टेडियममध्ये जखमी, पाहा व्हिडीओ
(sports news) पंजाब विरुद्ध बंगळुरू सामना झाला. या सामन्यात पंजाबने 54 धावांनी विजय मिळवला. बंगळुरूला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या मॅचमध्ये खूप चौकार षटकारांची बरसात पाहायला मिळाली. बंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदारने तुफान बॅटिंग केली. त्याच्यामुळे स्टेडियममध्ये एकजण जखमी झाला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रजत पाटीदारचा एक षटकार महागात पडला. त्याने षटकार ठोकल्यानंतर स्टे़डियममध्ये बसलेल्या एका वृद्ध चाहत्याच्या डोक्यात बॉल पडला. बॉल लागून वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
रजत पाटीदारने या सामन्यात 21 बॉलमध्ये 26 धावा केल्या. त्याने 1 चौकार आणि 2 षटकार ठोकले. बंगळुरूच्या 9 व्या ओव्हरमध्ये हरप्रीत ब्रार बॉलिंग करत होता. त्याच्या चौथ्या बॉलवर रजतने षटकार ठोकला. तो थेट स्टेडियममध्ये बसलेल्या वृद्ध व्यक्तीच्या डोक्यात बॉल पडला आणि दुर्घटना घडली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर याआधी चेन्नई विरुद्ध लखनऊ झालेल्या सामन्यात एका महिलेच्या डोक्यात बॉल लागला होता. युवा फलंदाज आयुष बदोनीने हा षटकार ठोकला होता. (sports news)
फाफ ड्यु प्लेसिसने पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करून 210 धावांचं टार्गेट दिलं होतं. बंगळुरूला हे टार्गेट गाठण्यात अपयश आलं. विराट कोहली पुन्हा एकदा खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसला.