IPL २०१९मध्ये झाले होते स्पॉट फिक्सिंग; ललित मोदींच्या ट्विटने खळबळ,

आयपीएल आणि वाद याचे जुने नाते आहे. कधी खेळाडूंच्यात तर कधी स्पर्धेत फिक्सिंगचे आरोप लागले. आयपीएलचा १५वा हंगाम सुरू आहे आणि प्लेऑफसाठीमध्ये पोहोचण्याची चुरस वाढली असताना एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे आयपीएल टी-२० लीग पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

आयपीएल २०१९ मध्ये झालेल्या कथित स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सीबीआयने पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सात संशयित सट्टेबाजांच्या विरोधात FIR दाखल केलाय. दुसऱ्या बाजूला २०१९चा एक व्हिडियो व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडिओ हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा आहे. हा व्हिडिओ आयपीएलचे माजी अध्यक्ष लिलत मोदी यांनी २०१९ साली शेअर केला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये शिवी देण्यात आल्याने संबंधित व्हिडिओचा ट्विट महाराष्ट्र टाईम्सने वापरलेला नाही. या व्हिडिओत दावा केलाय की ऋषभ पंतला आधीपासून माहिती होते की कधी चौकार मारला जाणार आहे. हा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला होता.नेपाळचा खेळाडू संदीप लामिछाने हा गोलंदाजी करत होता, तर फलंदाज रॉबिन उथप्पा होता. चेंडू टाकण्याआधीच पंत म्हणाला, असेही चौकारच असेल. उथप्पाने लगेच शानदार चौकार मारला. हा व्हिडिओ शेअर करताना ललित मोदी म्हणतात, काय जोक आहे… माझा विश्वास बसत नाहीय. मॅच फिक्सिंग आता मोठ्या स्तरावर होतेय. आयपीएल, बीसीसीआय आणि आयसीसी कधी जागे होणार, लाजिरवाणे. अधिकाऱ्यांना खरच कोणतीही काळजी नाही.आयपीएल २०१९मध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद मिळवले होते. तेव्हा मुंबईने चेन्नई सुपर किंग्जचा १ धावाने पराभव करून विजेतेपद मिळवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *