केतकी चितळे हिची बच्चू कडू यांनी उडविली अशी खिल्ली, म्हणाले…
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा, शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर केतकी चितळेने ( Ketki Chitale ) आक्षेपार्ह पोस्ट केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केतकीच्या पोस्टचा तीव्र शब्दात विरोध केला जातोय. इतकचं नाही तर केतकीविरोधात अनेक ठिकाणी तक्रार करण्यात आली. तर पुणे, कळवा, गोरेगाव, बीड आणि उस्मानाबाद या ठिकाणीही गुन्हे दाखल झालेत.
केतकीच्या या फेसबुक पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. अशावेळी राज्याचे शिक्षण राज्य मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनीही अभिनेत्री केतकी चितळेवर मिश्किल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
‘कोण ती चितळे? कोण आहे ती? जाऊ द्या तिला, तिने तिचं काम करा म्हणावं चित्रपटात’. ‘हा काही चर्चेचा विषय आहे का?’ ‘उद्धव साहेबांची सभा आणि आरतीचा काहीही सबंध नाही’. ‘दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा स्वत: मध्ये दम असेल तर तिने करावं’. ‘तिचा हा मुर्खपणा आहे. तिच्या बोलण्यामुळे कोणाला काहीही फरक पडणार नाही’. अशा शब्दात बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवि राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपावर बच्चू कडू म्हणाले, ‘रवि राणा उद्धव साहेबांच्या उंदीरा इतकीही जागा घेऊ शकत नाही’. ‘तसही राणा एवढा मोठा माणूस नाही. त्यामुळे त्याच्या वक्तव्याला इतकं महत्व देण्याचं कारण नाही’, असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी लगावला आहे.