दाऊदच्या हस्तकांच्या आवळल्या मुसक्या
1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात (1993 Mumbai Bomb Blast Case) गुजरात एटीएसने (Gujarat ATS) एक मोठी कारवाई केली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींच्या गुजरात एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले सर्व चारही आरोपी हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे हस्तक आहेत. (Gujarat ats arrest four wanted accused in 1993 Mumbai bomb blast case)
गुजरात एटीएसने अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सैय्यद कुरेशी या चौघांना अटक केली आहे. सर्वचच्या सर्व आरोपींना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे.
अहमदाबाद, 17 मे : 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात (1993 Mumbai Bomb Blast Case) गुजरात एटीएसने (Gujarat ATS) एक मोठी कारवाई केली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींच्या गुजरात एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले सर्व चारही आरोपी हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे हस्तक आहेत. (Gujarat ats arrest four wanted accused in 1993 Mumbai bomb blast case)
गुजरात एटीएसने अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सैय्यद कुरेशी या चौघांना अटक केली आहे. सर्वचच्या सर्व आरोपींना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे.
वाचा : डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या
1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर हे सर्व आरोपी परदेशात पळून गेले होते. हे आरोपी बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबादमध्ये आले होते. या संदर्भात गुजरात एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएसची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे पाकिस्तानच्या हातातील ISI या दहशतवादी संघटनेच्या छत्रछायेखाली लपून बसलेल्या डी गॅंगच्या खुरापती काही संपायच्या नाव घेत नाही. दहशतवादी कारवाया करणारा दाऊद इब्राहिम आता राजकीय नेत्यांच्या मुळावर उठलाय, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासातून समोर आला आहे. जो कधी आपल्या देशाचा झाला नाही तो पाकिस्तानचा काय होणार? पण आपल्याला पाकिस्तानमध्ये लपून राहायला मिळावे यासाठी अंडरवर्ल्ड डॅान दाऊद इब्राहिम हा सतत भारता विरोधात काही ना काही तरी खुरापती करतच असतो. त्यात आता त्याचा एक नवीन कारनामा समोर आलाय.
दहशतवादी कारवाया घडवून आणणारा दाऊद आता राजकीय नेत्यांना टार्गेट करत आहे. त्यात विशेष करुन हिंदूत्ववादी नेत्यांचा समावेश आहे, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासात झाला आहे.
NIAने 9 मे रोजीच्या पहाटे मुंबईसह नालासोपारा आणि इतर असे एकूण 27 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यानंतर NIAने 57 लोकांना चौकशीकरता बोलावले होते. ज्यापैकी 18 जणांची NIA कसून चौकशी करत होती. त्यापैकी छोटा शकीलचे नातेवाईक आरीफ आणि शब्बीर शेख या दोघांच्या विरोधात NIAला ठोस पुरावे आढळल्याने त्यांना NIAने 13 मेच्या पहाटे अटक करुन कोर्टात हजर केले.
1993 च्या बॅाम्बस्फोट प्रकरणात आरीफ आणि शब्बीर हे दोघेही आरोपी होते. पण नंतर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या नंतरही हे दोघे छोटा शकील मार्फत डी गॅंगच्या संपर्कात आहेत. हे अनेकदा समोर आले होते. पण देशात घातपात घडवण्यासाठी डी गॅंग रचत असलेल्या कटात हे दोघे शामिल होते, याचा खुलासा NIA ने काही दिवसांपूर्वी कोर्टात केला होता.