‘हर हर महादेव!’ शिवभक्तीत रमली कंगना रणौत
क्राइम थ्रिलर असलेल्या धाकड सिनेमाची उत्सुकता संपायला आता अवघा एक दिवस उरला आहे. २० मे ला हा सिनेमा पडद्यावर येणार आहे. जशी प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे तशीच उत्सुकता या सिनेमातील कलाकार कंगना रणौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांनाही आहे. त्यासाठी जोरदार प्रमोशन करण्यात धाकडची टीम देशभर फिरत आहे.
प्रमोशनच्या याच दौऱ्यात नुकतीच कंगना रणौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांनी वाराणासीला भेट दिली. यावेळी कंगनाने काशी विश्वनाथ मंदिरात हर हर महादेव म्हणत शिवपूजा केली. इतकच नव्हे तर धाकडला यश द्यावं यासाठी साकडंही घातलं. कंगनाचे हे शिवमंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून धाकड सिनेमाच्या निमित्ताने कंगना चर्चेत आहे. कधी ती सलमाच्या ईद पार्टीत धाकडचं प्रमोश करते तर कधी अक्षय कुमार, अजय देवगण यांना माझ्या सिनेमाचं प्रमोशन करण्याचं वावडं आहे असं म्हणत लक्ष वेधून घेते. सध्या तरी कंगनाच्या ‘धाकड’ सिनेमाची जोरात चर्चा सुरू आहे. या सिनेमात ती एका गुन्हेगाराच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाचा या सिनेमातील लुकही खूप व्हायरल होत आहे. कंगनाच्या बॉबकटला तिच्या चाहत्यांकडून खूप कमेंट आल्या आहेत.