हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड…वाहतुकीचे नवीन नियम पाहिले का?
हेल्मेट (Helmet) न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून 2 हजार रुपयांचं असेल. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने त्याचे सुधारित नियम अधिसूचित केले आहेत. मंत्रालयाच्या नियमांनुसार, देशात फक्त दुचाकींसाठी बीआयएस-प्रमाणित हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी आहे. म्हणजेच बाईक-स्कूटर चालवताना तुम्हाला फक्त ISI मार्कचे हेल्मेट घालावे लागेल.
दुचाकी चालवताना तुम्ही निकृष्ट दर्जाचे किंवा ISI मार्क नसलेले हेल्मेट घातलेले आढळल्यास, मोटार वाहन कायद्याच्या कलम 194D MVA अंतर्गत तुम्हाला 1 हजार रुपये दंड होऊ शकतो
एवढेच नाही तर हेल्मेट (Helmet) बेल्ट तुम्ही घट्ट केला नसेल, तरी तुम्हाला एक हजार रुपये दंड होऊ शकतो. एकंदरीत, जर तुम्ही ISI मार्क असलेले हेल्मेट न घालता घराबाहेर पडलात आणि त्या हेल्मेटची पट्टीही बांधली नाही, तर डोक्यावर हेल्मेट असूनही तुमचे 2 हजार रुपयांचे चलन कापले जाईल. वाहतूक पोलिसांसमोर तुम्ही कितीही वाद घातलात तरी चालान काही सेकंदात तुमच्या हातात येईल.
नवीन नियमांनुसार आता त्यांना दुचाकीवरून लहान मुलांची वाहतूक करताना विशेष हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणे बंधनकारक असणार आहे. हा पट्टा चालत्या बाईक-स्कूटरवरून मुलांना पडण्यापासून वाचवतो.
यासोबतच लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी वाहनांचा वेग ताशी 40 किमी निश्चित करण्यात आला आहे. तसे न केल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबन तसेच 1,000 रुपये दंड होऊ शकतो.