7 दिवसांपर्यंत आईच्या मृतदेहासोबत राहिली लेक;
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) लखनऊमधील इंदिरानगर स्थित मयूर रेजीडेन्सीमधून अशी एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण कॉलनी हैराण झाली आहे.
येथे राहणारी निवृत्त इंजिनियर सुनीला दीक्षित हिचा 7 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. यानंतरही त्यांची 26 वर्षांची मुलगी अंकिता आईच्या मृतदेहाशेजारी घरात बसून होती. तिने नातेवाईकांनाही सांगितलं नाही आणि शेजाऱ्यांनाही याबाबत कळवलं नाही. शेजारच्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घरी पोहोचले तर मुलगी दार उघडायला तयार नव्हती. ती काहीच उत्तर देत नव्हती. शेवटी पोलिसांनी बाहेरूनच दार उघडवलं आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.मूयर रेसिडेन्सीच्या 26 क्रमांकाच्या खोलीत राहणाऱ्या सुनीता एचएएलमध्ये इंजिनियर होत्या. तिने पतीला घटस्फोट दिला होता. येथे ती मुलगी अंकितासोबत राहत होती. या दोघी नातेवाईकांशी फार बोलत नव्हत्या. बुधवारी रात्री पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा आम्ही घरी गेलो तर दुर्गंधी सुटली होती. दार ठोठावलं तर कोणीच आवाज दिला नाही. शेवटी कसंबसं करून पोलिसांनी बाहेरून दार उघडलं.
शेजारच्यांनी सांगितलं की, पोलिसांनी जेव्हा दार उघडलं तर अंकिता केवळ इतकच म्हणाली की, काचेचा ग्लास तुटला आहे. जमिनीवर काचेचे तुकडे पडले आहेत, सांभाळून या. यानंतर ती काहीच म्हणाली नाही. पोलिसांनी आईच्या मृत्यूबद्दल तिला बरेच प्रश्न विचारले, परंतू तिने काहीच सांगितलं नाही. अंकिता मानसिक दृष्ट्या अस्वस्थ वाटत होती.
7 दिवसांपर्यंत आईच्या मृतदेहासोबत राहिली…
इतक्या कडक उन्हाळ्यातही अंकिता आपल्या आईच्या मृतदेहाशेजारी 7 दिवसांपर्यंत कशी राहिली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलीस जेव्हा घरात शिरले तर अंकिता आपल्या खोलीत चालत होती. आईचा मृतदेह दुसऱ्या खोलीत होता. प्राथमिक दृष्ट्या असच दिसत होतं की, या आठ दिवसात ती आपल्या खोलीत राहत होती. शेजारच्यांनी सांगितलं की, दोघीही कोणाशी फार बोलत नव्हत्या. कोणाच्याही घरी येणं-जाणं नव्हतं.
पतीसोबत घटस्फोट..
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीताचे पती रजनीश सचिवालयात कार्यरत होते. मात्र ते सचिवालयाच्या कोणत्या तरी कामात अडकले होते. यानंतर सुनीता आणि अंकिता यांना धक्का बसला होता. आणि यादरम्यान सुनीलाने घटस्फोट घेतला गोता. चार वर्षांपूर्वी या कॉलनीत त्या राहायला आल्याचं शेजारच्यांनी सांगितलं. कॉलनीचा वॉचमॅन आशिष कुमार यांनी सांगितलं की, बुधवारपासून परिसरात दुर्गंधी पसरली होती. ज्यानंतर येथे मृत्यू झाल्याचं समोर आलं.
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, सुनीताच्या डोक्यावर जखमांच्या निशाण दिसले आहेत. यावरुन कदाचित तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.