कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या मुलाचं नाव ऐकून हसू आवरणार नाही,

कॉमेडी क्वीन भारती सिंह (bharti singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (haarsh limbachiyaa) यांना 3 एप्रिल रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. या स्टार कपलचा बेबी आता 1 महिन्याचा झाला असून दोघेही पालक होणे म्हणजे काय असतात याची स्वर्गीय अनुभूती घेत आहेत. जेव्हा कधी कोणत्या सेलिब्रिटीच्या घरी लहान मुल जन्माला येतं, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आणि बाकी सर्वांनाच एका गोष्टीची उत्सुकता असते की त्यांनी आपल्या बाळाचे नाव काय ठेवले असेल वा बाळाचे नाव काय ठेवतील?

तर अशीच काहीशी उत्सुकता कॉमेडी क्वीन भारतीच्या चाहत्यांना देखील होती. अखेर त्याचा खुलासा झालाय खरा पण तिने आपल्या मुलाचे जे नाव ठेवले आहे ते ऐकून तुम्हाला सुद्धा काहीसे हसू येईल पण हे नाव क्युट सुद्धा वाटेल. आज आम्ही या लेखातून तुम्हाला भारतीने आपल्या मुलाचे नाव काय ठेवले आहे आणि त्यामागचे कारण काय ते तर सांगणारच आहोत पण सोबत तुम्ही तुमच्या मुलांसाठी अजून वेगळी नावे काय ठेवू शकता याचे ऑप्शन्स सुद्धा देणार आहो भारती सिंहने इंस्टाग्राम वर पती हर्षच्या कुशीत असणाऱ्या आपल्या मुलाचा मस्त गोड फोटो शेअर केला आणि या फोटोच्या कॅप्शन मध्ये तुने लिहिले आहे की, “हॅप्पी वन मंथ गोला.” हो मंडळी भारती आपल्या मुलाला प्रेमाने गोला अशी हाक मारते. अर्थातच हे त्याचे खरे नाव नाही. पण लाडाने सुद्धा फार कमी आई-वडिल आपल्या मुलाला गोला वगैरे नानावे हाक मारत असाव्यात आणि भारती त्यापैकीच एक आई ठरली आहे. असं नाव ऐकून आपल्याला देखील गंमत वाटते. हसू येते, पण सोबतच त्या आईने ज्या लाडाने आपल्या मुलाचे असे टोपण नाव ठेवले आहे ते पाहून प्रेम देखील निर्माण होते.आता तुमच्या मनात देखील हा प्रश्न आला असेलच की, प्रेमाने किंवा लाडाने हक मारायची तर अजून अनेक क्युट नावे आहेत, पण गोला हेच नाव का? तर भारतीने याचा खुलासा करताना सांगितले की तिला लाभलेला मुलगा हा मस्त गोलमटोल आणि पाहताच कोणालाही प्रेमात पाडणारा आहे आणि त्याच्याकडे पाहताच तिच्या मनात पहिलं हेच नाव आलं आणि मग म्हणून तिने आपल्या मुलाला तेव्हापासूनच लाडाने गोला अशी हाक मारायला सुरुवात केली. तसंच गोला हे एक हिंदू नाव असून त्याचा अर्थ नदी असाही होतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *