….अन्यथा सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा

जयप्रभा स्टडिओ चित्रीकरणासाठी खुला करून संबंधित विकसकाला पर्यायी जागा द्यावी, आदी मागण्यांसाठी गेल्या 99 दिवसांपासून आंदोलन (movement) सुरू आहे. तरीही सरकार कलाकारांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमींनी रविवारी पंचगंगा नदीत अर्धनग्न अवस्थेत जल ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध करीत लक्ष वेधले.

जयप्रभा स्टुडिओ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तो वाचविण्यासाठी गेले तीन महिने आंदोलन (movement) सुरू आहे. रविवारी पंचगंगा नदीत उतरून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्यात आले. सरकारने जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी खुला न केल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी पंचगंगा नदीत स्नान करून, तर काहींनी काठावर बसून सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

प्रसंगी नदीपात्रात जलसमाधी घेऊ, असा इशारा उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला. आंदोलनात चित्रपट महामंडळाचे संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, मिलिंद अष्टेकर, बाबा पार्टे, साधना माळी, प्रणोती कुमठेकर आदी सहभागी होते. जयप्रभा स्टुडिओ बचावअंतर्गत सोमवारी (दि.23) सकाळी 11 वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अंजिक्यतारा येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व मानवी साखळी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *