नवी ऑफर, मोबाइल रिचार्जवर १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार
सध्या आपला मोबाईल रिचार्ज संपला असेलतर रिचार्जा करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेकांकडे फोनपे, गुगलपे यासारखे अनेक अॅप आहेत. यावरुन आपण रिचार्ज करु शकतो. यावरुन आता कॅशबॅकही मिळू शकतात. आता पेटीएम (Paytm)ने ही कॅशबॅकची ऑफर आणली आहे. पेटीएम (Paytm) आपल्याला १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक देणार आहे. पेटीएम वरून मोबाईल कसा चार्ज करायचा ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कॅशबॅक मिळेल.
या स्टेप वापरुन तुम्ही मोबाईल रिचार्ज केला तर तुम्हाला १ हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. पेटीएम आपल्या ग्राहकांसाठी नव नवीन ऑफर सुरु करत असते. आता पेटीएमने मोबाईल रिचार्जवरती ऑफर सुरु केली आहे.
Paytm
संभाजीराजेंनी ऑफर नाकारली; शिवसेना उमेदवार जाहीर करणार, ‘या’ नावांची चर्चा
पेटीएमने (Paytm) मोबाईल रिचार्जवर कॅशबॅक कसा मिळवायचा?
पहिल्यांदा पेटीएम (Paytm) अॅपवर जावे लागेल. त्यानंतर मोबाईल रिचार्जचा पर्याय निवडा. येथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. त्यानंतर तुमच्या सीम नंबरचा ऑपरेटर निवडा. येथे तुम्हाला रिचार्जचे पर्याय मिळतील. तुम्हाला जे रिचार्ज करायचे आहेत ते प्लॅन तुम्ही निवडू शकता. यानंतर, पेमेंट करण्यापूर्वी, तुम्हाला प्रोमोकोड लागू करण्याचा पर्याय दिसेल. Apply Promocode या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला रिचार्जसाठी अर्ज करायचा असलेला प्रोमोकोड निवडावा लागेल. त्यानंतर पेमेंट करा. यानंतर तुमचा रिचार्ज होईल. प्रोमोकोडवरुन तुम्हा कॅशबॅक मिळणार आहे.
आजच म्हणजे २३ मे रोजी पेटीएम (Paytm) वरुन मोबाईल रिचार्ज करत असताना प्रोमोकोडचा पर्याय निवडला तेव्हा तेथे दोन पर्याय दिसत होते. यात फ्लॅट रु. १० कॅशबॅक आणि दुसरा पर्याय होता – रु १००० पर्यंत कॅशबॅक, असे दोन पर्याय होते. यातील दुसरा पर्याय म्हणेजच १ हजार रुपयांचा निवडला तर तुम्हाला १ हजारांचा कॅशबॅक मिळू शकतो. यासाठी पेटीएमच्या (Paytm) काही नियम आणि अटी आहेत. त्या अगोदर तुम्ही जाणून घेऊ शकता.