सावधान! वस्तू विक्रीच्या बहाण्याने चोरी
(crime news) वस्तू विक्रीच्या बहाण्याने आलेल्या एका महिलेने घरातील साडेतीन तोळ्यांचे दागिने व दोन हजारांची रोकड लंपास केली. काल दुपारी शुक्रवार पेठ परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित महिलेस ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले, शुक्रवार पेठ परिसरात एक महिला कुटुंबासोबत राहते. काल दुपारी त्यांच्या घरात एक महिला वस्तू विक्रीच्या बहाण्याने आली. तिने घरातील महिलेला बोलण्यात गुंतवले.
काही वेळानंतर घरची मंडळी माझ्याकडे बघत असल्याचे संशयितेने सांगितले. त्यामुळे त्या तिला बेडरूममध्ये घेऊन गेल्या. तेथे तिने बोलण्यात गुंतवणूक कपाटातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन हजार रुपये घेऊन ती पसार झाली. काहीवेळाने हा प्रकार संबंधित महिलेच्या लक्षात आला. त्यांनी याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. त्यांनी संशयित महिलेस ताब्यात घेतले. याची नोंद करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते. (crime news)