राक्षसी नवऱ्याने पत्नीला मारहाण करत पाडला रक्ताचा सडा
(crime news) पती आणि पत्नी यांच्यात वाद होत असतात. मात्र, भिवंडीत (Bhiwandi) पती आणि पत्नी यांच्यातील वाद इतका वाढला की, रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (wife beaten) केली. या मारहाणीत पत्नी रक्तबंबाळ होऊन घरात पडली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या घरात धाव घेतली. यानंतर घटनेमागचं कारण समोर आल्यानंतर सर्वांना आणखी एक धक्का बसला.
सद्याच्या काळात किरकोळ वाद जीवावर बेतत असल्याचे पाहावयास मिळत आहेत. पत्नीने फक्त भात शिजवला नसल्याच्या रागातून पतीने तिला बेदम मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिवंडी तालुक्यातील खोणी गावातील एका चाळीत घडली आहे. या हत्येप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. शंकर वाघमारे (वय, 23) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. तर ज्योत्स्ना वाघमारे (वय, 20) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.
पती शंकर वाघमारे हा भंगार विक्रेता असून तो भिवंडी तालुक्यातील खोणी गावातील बाळाराम चौधरी यांच्या चाळीत भाड्याने पत्नी सोबत राहत होता. पत्नी ज्योत्स्नासोबत वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. रात्रीच्या जेवणात आरोपी पती शंकर याने भात शिजविण्यासाठी पत्नीला सांगितले. मात्र तिने भात शिजवलाच नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. (crime news)
हा वाद एवढा विकोपाला गेला की, पतीने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात, पाठीत, पोटात बेदम मारहाण केली. या लाकडी दांडक्याच्या हल्ल्यात ती घरातच जमिनीवर पडली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या घरात धाव घेतली. त्यावेळी पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून पतीला शेजाऱ्यांनी पकडून ठेवले.
त्यानंतर घटनेची माहिती निजामपुरा पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आणि गंभीर जखमी अवस्थेत पत्नीला स्वर्गीय इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपी पती शंकर यास पोलिसांनी अटक केली असून आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल लांबे यांनी दिली आहे.