आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात
(sports news) Team India तील खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातातून सावरत असतानाच आणखी एका खेळाडूचा भीषण अपघात झाल्याच्या वृत्तानं क्रिकेट जगताला हादरा बसला आहे. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये त्याच्या कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवानं हा खेळाडू यामध्ये थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येत आहे. एका भयंकर अपघातातून बचावलेला हा खेळाडू आहे, प्रवीण कुमाक.
सूत्रांच्या माहितीनुसार प्रवीणच्या कारला एका कँटर ट्रकनं धडक दिली. अपघातावेळी प्रवीण आणि त्याचा मुलगा कारमधून प्रवास करत होते. अपघात इतका मोठा होता की, त्या क्षणी तातडीनं स्थानिकांनी एकत्र येत ट्रक चालकाला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
कुठे झाला अपघात?
बागपत रोडनजीक असणाऱ्या मुलतान नगर येथे राहणारा प्रवीण त्याच्या मुलासह मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याच्या डिफेंडर कारं पांडव नगरच्या दिशेनं निघाला होता. पण, आयुक्त निवासाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या वेगवान कँटर ट्रकनं त्याच्या कारला धडक दिली. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं, पण प्रवीण आणि त्याला मुलगा मात्र सुखरुप असल्याचं म्हटलं गेलं.(sports news)