ND vs WI मालिका कोणत्याच स्पोर्ट्स चॅनेलवर दिसणार नाही! कुठे पाहाल LIVE स्ट्रीमिंग

(sports news) भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. जिथे सर्व खेळाडू पोहोचले आहेत आणि त्यांचे सराव सत्र पूर्ण करत आहेत. वनडे वर्ल्डकपच्या वेस्ट इंडिज दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचवेळी, टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची (IND vs WI 2023) मालिका १२ जुलैपासून सुरू होणार आहे. कसोटी मालिकेशिवाय दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामनेही खेळले जाणार आहेत. पण या दोन्ही संघांडमधील सामन्याचे लाईव्ह प्रसारण नेमके कुठे केले जाणार याबाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. जीव सिनेअ किंवा नावाजलेल्या स्पोर्ट्स चॅनेलयावर या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहता येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील लाइव्ह स्ट्रीमिंगबद्दल बरीच चर्चा झाली आहे, कारण जिओसिनेमा आणि फॅनकोड यांच्यात करार चालू होता, जो आता अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमधील सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण हे कोणत्याही नावाजलेल्या स्पोर्ट्स चॅनेलवर आपल्याला पाहता येणार नाही. या सस्पोर्ट्स चॅनेल ऐवजी दूरदर्शनवर हे सामने पाहता येणार आहेत. जिओ सिनेमा ऐवजी फॅनकोड या ओटीटी प्लॅटफ़ॉर्मवर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. इनसाईड स्पोर्ट्सने हे वृत्त दिले आहे.

कोणत्या चॅनलवर पाहता येणार सामने

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेचे कोणतेही चॅनल थेट प्रक्षेपण करणार नाही. जिओसिनेमा आणि फॅनकोडमधील करार अयशस्वी झाल्यानंतर, लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोडवर प्रसारित होताना दिले. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाईल. चाहत्यांना आपल्या डी डी स्पोर्ट्सवर हे सामने पाहता येणार आहेत. डीडी स्पोर्ट्सवर कसोटीचे हिंदी आणि इंग्रजीमध्ये असेल, तर टी२० आणि एकदिवसीय मालिका हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, बंगाली आणि कन्नडमध्ये डीडी स्पोर्ट्सवर तसेच नेटवर्कच्या प्रादेशिक चॅनेल डीडी पोधिगाई, डीडी सप्तगिरी, डीडी यादगिरी, डीडी बांगला आणि डीडी चंदना प्रसारित केल्या जातील.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका प्रसारित करणार्‍या सर्व चॅनेलची एकूण पोहोच १६० दशलक्षांपेक्षा जास्त आहे. फ्री-टू-एअर चॅनेलद्वारे भारताच्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकेचे हे सर्वात व्यापक कव्हरेज असेल. (sports news)

वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या अशी नावं आहेत ज्यांवर सगळ्यांच्या नजरा कायम आहेत. मात्र यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे, ज्यांच्यावर सर्वांचे विशेष लक्ष असेल. प्राथमिक मीडिया अधिकार धारक म्हणून, फॅनकोड संपूर्ण मालिका त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *