एअरपोर्टवर दिसताच आराध्या बच्चन तूफान ट्रोल

(entertenment news) बॉलिवूडचे स्टारकीड्स हे ट्रोलर्सच्या रडारवर असतात. त्यांनी काहीही केले तरी ते मात्र बिचारे ट्रोल होतातच होता. स्टारकीड्सनं काहीही केलं तरी ते ट्रोल होतातच होतात आता आराध्याकडेच पाहा ना! अशी हेअरस्टाईल हा काय तिचा दोष? पण नेटकऱ्यांनी मात्र पुरती खिल्ली उडवली आहे. आता नुकतीच आराध्या आपल्या आईसह सोशल मीडियावर आपल्या आईसह आणि वडिलांसह स्पॉट झाली आहे. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष आराध्याच्या केसांकडे होते. आराध्याची हेअरस्टाईल ही तिची ओळख झाली आहे. त्यामुळे आराध्या कुठेही स्पॉट झाली तर सर्वांचेच लक्ष हे तिच्या हेअरस्टाईलकडे जाते. आराध्या आता काही लहान राहिली नाही. त्यातून तिची हेअरस्टाईल ही बार्बी डॉल प्रमाणे आहे आणि लहानपणी तुम्ही आम्ही केलेली ही स्टाईल आपल्यालाही आठवत असेलच.

परंतु आता आराध्या मोठी झाली आहे आणि त्यातून तिची ही हेअरस्टाईल बदलायला काहीच हरकत नाही अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे. परंतु कुणी काय हेअरस्टाईल करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यातून आराध्याची ही हेअरस्टाईल आता नेटकऱ्यांच्या डोळ्यात फारच खुपू लागली आहे. अशावेळी नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. तुमच्या लक्षात असेल की याआधीही आराध्या आणि तिची आई ऐश्वर्या अशाप्रकारे हसत हसत एअरपोर्टवरून घरी जायला निघाले होते. तेव्हा आराध्यालाही अशाचप्रकारे नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. त्यामुळे नेटकरी यावेळी त्या दोघींचा पिच्छा सोडतं नाही आहे. आता यावेळीही तिला नेटकऱ्यांनी टोमणे मारले आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहून तुम्हालाही आपलं हसू आवरता येणार नाही. (entertenment news)

नक्की काय म्हणाले ट्रोलर्स?

यावेळी मायलेकी ट्रोलर्सच्या निशाण्यावर होत्या. एका ट्रोलर्सनं लिहिलं आहे की, ”ऐश्वर्याचं ड्रेसिंग तर दिवसेंदिवस बघत जाते आहे.” तर दुसऱ्या एका ट्रोलरनं लिहिलं आहे की, ”11 वर्षे झाली तरीसुद्धा अजूनही आम्ही आराध्याचं कपाळ हे पाहिलं सुद्धा नाहीये”. तर तिसऱ्या एकानं कमेंट केली आहे की, ”सगळं काही बदलेल परंतु आराध्याची हेअरस्टाईल काही केल्या बदलणार नाही” त्यांना पुन्हा एकदा एअरपोर्टवर पाहून काहींनी अशी कमेंट केली आहे की, ”तुम्ही लोकं रात्री झोपता की नाही?”

यावेळी रात्री आराध्या आपल्या आईवडिलांसोबत ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी त्या तिघांनीही कॅज्यूअल कपडे परिधान केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *