सावत्र भावांसोबत असलेल्या नात्याबद्दल ईशा देओलच मोठं वक्तव्य

(entertenment news) अभिनेते धर्मेंद्र यांचे दोन्ही कुटुंब कायम सर्वत्र चर्चेत असतात. गेल्या दिवसांपासून देओल कुटुंब अभिनेते सनी देओल यांच्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘गदर २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. ‘गदर २’ सिनेमामुळे देओल कुटुंबातील अनेक गोष्टी देखील समोर आल्या. एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांची चार मुलं एकत्र दिसली. धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हिने ‘गदर २’ सिनेमाच्या स्क्रिनींगचं आयोजन केलं होतं. सिनेमाच्या स्क्रिनींसाठी धर्मेंद्र यांचं पहिलं कुटुंब देखील उपस्थित होतं. आता नुकताच झालेल्या मुलाखतीत ईशा देओल हिने सावत्र भाऊ सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर देओल कुटुंब पुन्हा चर्चेत आलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत ईशा देओल म्हणाली, ‘काही अशा गोष्टी आहेत, ज्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. कोणीही कितीही समजावलं तरी काही गोष्टींबद्दल मी कधीच बोलणार नाही.’ एवढंच नाही तर, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्याकडून मिळत असलेल्या प्रेमासाठी अभिनेत्रीने वडील धर्मेंद्र यांचे आभार मानले आहेत…

पुढे ईशा देओल म्हणाली, ‘सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याची वडिलांपासून झाली आहे. धर्मेंद्र एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत आणि आम्ही त्यांचे बीज आहोत. म्हणून त्यांच्याकडून मिळालेला वारसा आम्ही पुढे नेत आहोत. लोकांच्या मनात आमच्या वडिलांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे आम्हाला देखील लोकांचं प्रेम मिळत आहे…’

सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल ईशा देओल म्हणाली, ‘वर्षांपूर्वी सर्वांना वाटयचं आयुष्य सुरळीत राहिल. पण असं काहीही होत नाही. वेळेनुसार सर्व गोष्टी बदलतात आणि बदलेल्या गोष्टींप्रमाणे आपण वागायला हवं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. तर ‘नकारात्मक ऊर्जेपेक्षा आनंद राहायला हवं…’ असं सनी देओल म्हणाले होते.

ईशा देओल हिचं सावत्र भावांसोबत असलेलं नातं कायम चर्चेत असतं. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजपर्यंत हेमा मालिनी यांनी पतीच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.(entertenment news)

हेमा मालिनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. ज्यामुळे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचं लग्न झालं पण करण याच्या लग्नात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या म्हणून सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *