तिहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले!

(crime news) माळाकोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरी (तालुका कंधार) येथील भारतीय सैन्यात जवान असलेल्या एकनाथ मारुती जायभाय (32 वर्षे) याने त्याच्या गर्भवती पत्नीसह मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना त्याच्या बोरी येथील घरी बुधवारी सकाळी 6 वाजता घडल्याचे उघड झाली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बोरी (ता. कंधामाळा कोळीर) येथील एकनाथ जायभाय हा राजस्थान बिकानेर येथे कर्तव्यावरून गावी सुट्टीवर आला असताना त्याने पत्नी भाग्यश्री एकनाथ जायभाय (वय 22), तर मुलगी सरस्वती (4) यांचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे त्याची पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे समजते. हे कृत्य केल्यानंतर आरोपी एकनाथ जायभाय याने स्वतः पत्नीच्या बहिणीला फोनवरून कळविले आणि तो स्वतः माळाकोळी पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी मारुती थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.

दहा लाखांची मागणी

एकनाथ जायभाये याच्याकडून पत्नी भाग्यश्रीच्या माहेरी 10 लाख रुपयांची मागणी केली जात होती. त्यामुळेच आपल्या मुलीचा खून करण्यात आला आहे, असा आरोप भाग्यश्रीच्या आईने केल्याचे सांगण्यात आले. पत्नीचा खून करण्यापूर्वी एकनाथ याने मंगळवारीच कंधार येथे जाऊन मुलगी व पत्नीच्या नावावर बँकेत जमा असलेली रक्कम काढून घेतल्याची माहितीही समोर आली आहे.(crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *