‘मोहम्मद सिराजला स्पीड चलान…’, दिल्ली पोलिसांचं भन्नाट ट्वीट व्हायरल
(sports news) भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाची अक्षरश: पिसं काढली. मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडलं. मोहम्मद सिराजने केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने फक्त 50 धावात श्रीलंका संघाला गुंडाळलं आणि अत्यंत सहजपणे हे लक्ष्य करत आशिया चषक आपल्या नावे केला. भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर सगळीकडेच मोहम्मद सिराजची चर्चा सुरु आहे. त्यातील एक ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे.
मोहम्मद सिराजवर सगळीकडे स्तुतीसुमनं उधळली जात असताना दिल्ली पोलिसांच्या एका ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोहम्मद सिराजने केलेल्या तुफान गोलंदाजीचं कौतुक करताना दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘सिराजला आज वेगमर्यादा ओलांडल्याचा कोणताही दंड नाही’.
दिल्ली पोलिसांनी केलेलं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. या ट्वीटवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून अक्षरश: पाऊस पडला आहे.
पावसाने व्यत्यय आणल्याने भारत आणि श्रीलंकेतील अंतिम सामना उशिराने सुरु झाला होता. दरम्यान श्रीलंकेने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला.
मोहम्मद सिराजने गोलंदाजीला सुरुवात केली असता पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव दिली नाही. यानंतर टाकलेली ओव्हर त्याच्यासाठी स्वप्नवत ठरली. या एकाच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पाथुम निसांकाला झेलबाद केलं. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा आणि चरिथ असालंका यांच्या विकेट्स घेतल्या. समरविक्रमा पायतीच झाला, तर असलंका कव्हर्समध्ये झेलबाद झाला. (sports news)
अखेरच्या चेंडूवर त्याने धनंजया डी सिल्वाला झेलबाद केले. या जादुई षटकानंतर त्याने आणखी एक विकेट घेतली. त्याच्या पुढच्याच षटकात त्याने शनाकाला बोल्ड केले. यासह त्याने अवघ्या 16 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या. त्याने सर्वात वेगाने 5 विकेट घेण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी आहे. श्रीलंकेच्या चमिंडा वासने 2003 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध केवळ 16 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या.
2008 मध्ये श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने भारताविरुद्ध 6/13 अशी कामगिरी केली होती. यानंतर आशिया चषकाच्या फॉर्मेटमध्ये 6 बळी घेणारा सिराज हा दुसरा गोलंदाज ठरला