कमकुवत हाडे मजबूत करा, आहारात करा ‘या’ 5 गोष्टींचा समावेश

मजबूत हाडांसाठी (bones) काय गरजेचं असतं. प्रथिने, लोह, कॅल्शियम. पालक भाजी अनेकांना आवडत नाही पण ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते. पालकामध्ये लोह असतं. मजबूत हाडांसाठी पालक खाणे गरजेचं आहे.

ज्या लोकांना दूध आवडत नाही अशा लोकांना सोयाबीनचा ऑप्शन दिला जातो. शाकाहारी लोक सुद्धा सोयाबीन आवर्जून खातात. सोयाबीन मध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतं. चांगल्या हाडांसाठी हे उत्तर असतं.

तुम्ही कधी ऐकलंय का अननस खाल्ल्याने हाडे (bones) मजबूत होतात? आपल्याला फळांचे सेवन करा असं नेहमी सांगितलं जातं. फळे, दूध आणि ड्रायफ्रुट्स या तीन गोष्टी आरोग्यासाठी खजिना आहेत. फळांमध्ये अननस हे असं फळ आहे जे तुमची हाडे मजबूत करेल.

दुधामध्ये प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं. हाडे चांगली आणि मजबूत राहावीत यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज असते. दुधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. मजबूत हाडांसाठी दूध न चुकता प्यावं.

ड्राय फ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने खूप फायदे होतात आणि ते रात्रभर भिजवत ठेऊन सकाळी खावेत असा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. बदाम खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. बदामात कॅल्शियम, व्हिटॅमिन ई आणि फॅटी ॲसिड असते याने आपली हाडे मजबूत होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *