कोल्हापूर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात केले बदल

गणेश चतुर्थीदिवशी शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. बापट कॅम्प येथे प्रवेश व बाहेर पडण्यासाठी एकेरी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. गंगावेस, शाहूपुरी कुंभार गल्लीत वाहनांना प्रवेश (entry) बंद करण्यात आला आहे.

बंद प्रवेश मार्ग

बापट कॅम्प कुंभार गल्ली : शिरोली टोल नाक्याकडून बापट कॅम्पकडे जाणारे मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश (entry) बंद करण्यात आला आहे. ही वाहने मार्केट यार्ड चौक, जाधववाडी मार्गे पुढे मार्गस्थ होतील.शाहू मार्केट यार्डसमोरून बापट कॅम्प कुंभार गल्लीमध्ये जाणारी वाहने पुढे जाऊन अनेगा वडा सेंटर, शिरोली टोल नाका येथून बाहेर पडतील.

शाहूपुरी कुंभार गल्ली : शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये जाणार्‍या वाहनांना नाईक अँड नाईक कंपनी, रिलायन्स मॉल, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, गवत मंडई चौकात प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पापाची तिकटी (गंगावेस) कुंभार गल्ली : पापाची तिकटी, जोशी गल्ली, शाहू उद्यान या ठिकाणांहून वाहनांना कुंभार गल्लीत जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *