बनवा हेल्दी मोदक, अजिबात वाढणार नाही वजन

आज सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले असतील. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणराय आले असून बाप्पाला मोदक ( Healthy Modak Recipes ) फार प्रिय असतात. आगामी तब्बल 10 दिवस भक्त गणपती बाप्पाची पुजा करणार आहेत. दर दिवशी बाप्पा वेगळे नैवेद्य द्यावे लागतात. अशावेळी गोड पदार्थांमुळे लोकं आरोग्याच्या दृष्टीने काहीसे चिंतेत राहतात.

मात्र आज आम्ही तुम्हाला हेल्दी मोदक ( Healthy Modak Recipes ) कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत. मोदकांच्या या हेल्दी रेसिपी स्वादिष्ट असण्यासोबतच तुमच्या वजनात देखील वाढ करणार नाही. यावेळी मोदकात अनावश्यक साखर आणि मावा वापरला जातो. यांच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया हेल्दी मोदक ( Healthy Modak Recipes ) बनवण्याची रेसिपी.

मखाना मोदक

साहित्य

मखाना- 2 कप
तूप- 1 स्पून
बदाम- 4 ते 5 (Almonds)
काजू- 4 ते 5
खोबऱ्याचा खिस
पिस्त्याचे तुकडे – 1 चमचा
फुल क्रीम दूध- 1/2 लीटर
मध- चवीनुसार
3 वेलच्यांची पूड

मखाना मोदक बनवण्याची पद्धत

मखनाचे मोदक बनवण्यासाठी मखाना गॅसवर व्यवस्थित फ्राय करून. त्यानंतर आता एका कढईत तूप गरम करून त्यात बदाम(Almonds), काजू, पिस्ते आणि खोबऱ्याचा खिस परतवून घ्या. एका कढईत दूध गरम करायला ठेवा. दूध घट्ट झाल्यावर फ्राय मखना मिक्सरमध्ये बारीक करून दुधात मिसळा. ड्रायफ्रुट्स आणि मध टाकून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यानंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर साच्यात भरून मोदक बनवा. तर अशा पद्धतीने तुमचे मखाणा मोदक तयार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *