शाहू छत्रपती महाराजांचं मराठा आरक्षणाविषयी मोठं विधान

सरकार मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) कसे देणार, हे कळायला हवे, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी व्यक्त केली. नवीन राजवाडा (न्यू पॅलेस) येथे गणेश प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने (Kolhapur Ganeshotsav) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘आरक्षण कसे द्यावे, यातला मी तज्ज्ञ नाही. लोकांना योग्य मार्गदर्शन करणे नेत्यांचे कर्तव्य आहे. आरक्षण (Maratha Reservation) मिळणार असेल किंवा नसेल तर स्पष्ट सांगावे. लोकांना झुलवत ठेवणे योग्य नाही. आरक्षणाविषयी सरकारच्या (Maharashtra Government) मनात काय आहे, हे मला माहीत नाही. ते कशातऱ्हेने आरक्षण देणार, हे सर्वांना कळायला हवे. घटनादुरुस्तीशिवाय ते मिळणार नाही, हे तितकेच खरे आहे.’

संसद एक असे स्थान आहे, जिथे सर्वांना विचार व्यक्त करता येतात. चर्चाही करता येते. जेणेकरून सर्वांना लोकांसाठी, देशासाठी चांगले निर्णय घेता येतात. देशात १९५० पासून घटना अस्तित्वात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंहाचा वाटा उचलून घटना तयार केली.

त्यात संसद महत्त्वाची आहे. आता मी सिव्हिल कोर्ट सुरू करण्याबाबत ऐकतोय; पण त्यावर चर्चा झाली पाहिजे. एखाद्या पक्षाला बहुमत असेल, तर ते पास होणार हे खरे असले तरी चर्चा होणे अपेक्षित असल्याचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *