चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी; ‘या’ तारखेला कुठलाही चित्रपट पाहा फक्त 99 रुपयांत

राष्ट्रीय चित्रपट दिवसाच्या निमित्तानं सरकार हे नानाविध उपक्रम करत असतं. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. यादिवशी आपल्याला चित्रपट (movie) हे अगदी मोफत पाहायला मिळत असतात किंवा कमी किमतीतही पाहायला मिळतात. त्यामुळे चित्रपटप्रेमींसाठी ही चांगलीच पर्वणी असते. यंदाच्या वर्षीही आपल्याला ही पर्वणी पाहायला मिळणार आहे. तुम्हाला माहितीये का येत्या राष्ट्रीय चित्रपट दिवसाच्या निमित्तानं तुम्ही कोणताही चित्रपट हा 99 रूपयात पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया की नक्की ही ऑफर काय आहे आणि यंदा प्रेक्षकांना यातून काय लाभ मिळेल हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. प्रेक्षकांना विविध दरात विविध चित्रपट पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक पर्याय यावेळी प्रेक्षकांना मिळतात. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे या नव्या ऑफरची. तुम्ही सर्वात कमी तिकिटात चित्रपट पाहू शकता.

कमी किमतीत टिकीटदर ठेवल्याचा त्याचा फायदा हा चित्रपटांना आणि त्यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला आहे. त्यामुळे अशा चित्रपटांनी अवलंबलेला कमी तिकीटांचा फायदा हा या चित्रपटांनाही झालेला आहे. त्यातून यावेळी बॉक्स ऑफिसवरही हे चित्रपट जोरात चर्चेत आहेत. या महिन्यात प्रदर्शित झालेला ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. शाहरूख खानचा हा दुसरा चित्रपट आहे जो यंदा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे.

राष्ट्रीय चित्रपट (movie) दिवस 13 ऑक्टोबरला ही सवलत मिळेल. Multiplex Association Of India नं ट्विट केल्यानुसार यावेळी 4000 हून अधिक चित्रपट हे भारतभर प्रदर्शित होणार आहेत. तेव्हा या चित्रपटांचा तुम्हाला 99 रूपयांमध्ये आनंद घेता येईल.

यावर्षी आलेला पठाण हा चित्रपटाही बॉक्स ऑफिसवर तूफान गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. या दोन्ही चित्रपटांनी जगभरात बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली आहे.

यावर्षी अनेक हॉलिवूड चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे अशा चित्रपटांचीही जोरात चर्चा ही रंगलेली असते. यावेळी हॉलिवूडच्या तिकिटांची किंमत पाहिली तर तिही कमी होती. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होती. त्यातून बॉक्स ऑफिसवरही त्यांचे कलेक्शन हे फारच चांगले होते. येत्या काही दिवसांत बॉलिवूड चित्रपटांचीही तुम्हाला पर्वणी पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *