खासदार किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला आणखी एक घोटाळा

(political news) कोव्हिड काळातील भ्रष्टाचाराबाबत ठाकरे गटाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी आणखी एक घोटाळा उघडकीस आणला आहे.
कोव्हिड काळात उद्धव ठाकरे सेनेने कोव्हिड रुग्णांचा श्वास चोरला असून त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा 100 कोटींचा ऑक्सिजन घोटाळा असून विविध बेनामी कंपन्यांच्या नावाने हा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. या घोटाळ्यातील अनेकांची नावे लवकरच समोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (political news)