अन् शेतमजुरांचा घडला विमान प्रवास, टाकळीच्या शेतकऱ्याचा स्वखर्चातून उपक्रम

एखाद्या तीर्थक्षेत्राला शेतमजुरांना (farm labourers) जावयाचे झाल्यास, त्यांचा प्रवास खाजगी वडापमधून अथवा लालपरी मधून. मात्र टाकळी (ता. शिरोळ) येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने स्वखर्चाने, आपल्या शेतात इमानी इतबारी काम करणाऱ्या शेतमजुरांना तिरुपती बालाजीचे दर्शन घडवताना विमानातून प्रवास घडविला.

विमान, रेल्वे प्रवास घडवून त्या शेतकऱ्याने मजुरांशी आपले नाते आणखी दृढ केले.टाकळी (ता. शिरोळ) येथील शेखर सदाशिव पाटील यांची हे कष्टाळू शेतकरी आहेत.

काहींचा रेल्वे प्रवासही पहिल्यांदाच

या शेतमजुरापैकी कांही शेतमजुरांनी (farm labourers) रेल्वेचा प्रवासी केला नव्हता अशा सर्वच शेतमजुरांना विमानाचा प्रवास त्यांच्या आयुष्यात घडल्यामुळे त्या शेतमजुरांनी पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *