वर्ल्डकपच्या 48 वर्षात जे झालं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं

(sports news) न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रने आपल्या पहिल्याच वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्याने अनेक विक्रम मोडीत काढत आपली गुणवत्ता वर्ल्डकपसारख्या तगड्या स्पर्धेत सिद्ध करून दाखवली.
आज सेमी फायनलमधील प्रवेशासाठी महत्वाच्या असणाऱ्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रचिन रविंद्रने दमदार शतक ठोकत न्यूजीलंडची सामन्यावरील पकड मजबूत करण्यास मदत केली. रचिनचे हे यंदाच्या वर्ल्डकपमधील तिसरे शतक आहे.
रिचन हा पदार्पणाच्या वर्ल्डकपमध्ये तीन शतके करणारा वर्ल्डकपच्या 48 वर्षाच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच तो न्यूझीलंडकडून एका वर्ल्डकप स्पर्धेत तीन शतके करणारा देखील पहिलाच फलंदाज ठरला.
शतकाबरोबरच रचिन हा पदार्पणात वर्ल्डकपमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. 23 वर्षाच्या रचिनने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 523 धावा केल्या आहेत.
एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या (25 वर्षापेक्षा कमी वयाचा फलंदाज) यादीत सचिन तेंडुलकर हा 523 धावा करून पहिल्या स्थानावर होता. त्याने 1996 च्या वर्ल्डकपमध्ये हा कारनामा केला होता. आता रचिनने त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली असून त्याच्या देखील 523 धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडचा लीग स्टेजमधील अजून एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे तो सचिनचे रेकॉर्ड नक्की मोडू शकतो. (sports news)
राज्य बॅडमिंटन स्पर्धा : आजपासून निवड चाचणी स्पर्धेला सुरवात, सुमारे ३०० हून अधिक बॅडमिंटनपटू दाखल
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडच्या सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि रचिन रविंद्र यांनी 68 धावांची सलामी देत दमदार सुरूवात करून दिली. यानंतर हसन अलीने कॉन्वेला 35 धावांवर बाद करत पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले.
मात्र रचिन आणि कर्णधार केन विलियमसनने दुसऱ्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी रचत किवींना 30 षटकातच 200 पार पोहचवले. रचिनने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले तिसरे शतक पूर्ण केले. मात्र केन निलियमसनचे शतक अवघ्या 5 धावांनी हुकले. त्याने 79 चेंडूत 10 चौकार 2 षटकारांच्या मदतीने 95 धावांची आक्रमक खेळी केली.
केन पाठोपाठ रचिन देखील 94 चेंडूत 108 धावांची शतकी खेळी करून बाद झाला. रचिनने आपली ही शतकी खेळी 15 चौकार आणि एक षटकाराने सजवली.