प्रसिद्ध गायक अडकणार पोलिसांच्या कचाट्यात, काय आहे प्रकरण?

(entertenment news) ‘बिग बॉस ओटीट 2’ शोचा विजेता एल्विश यादव याच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष वापरल्या प्रकरणी एल्विश वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एल्विश याच्या अडचणींमध्ये वाढ होत असताना आता बॉलिवूडचा आणखी एक प्रसिद्ध वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एल्विश यादव याच्यानंतर गायक फैजलपुरीया आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पोलिसांनी फैजलपुरीया याच्यावर निशाणा साधला आहे. 5 महिन्यांपूर्वीच्या जुन्या प्रकरणात नोएडा सेक्टर 49 पोलीस ठाण्यातून फैजलपुरी याला नोटीस बजावण्यात आली आहे.

एल्विश यादव आणि फैजलपुरीया यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यावर तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. आता एल्विश यादवचं प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा फैजलपुरिया याच्यावर निशाणा साधण्याची तयारी सुरु केली आहे. एल्विश यादव प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एल्विश यादव आणि फैजलपुरिया दिसत होते. दोघांनी सापांसोबत एक व्हिडीओ शूट केला होता. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पण कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. या प्रकरणी फैजलपुरिया याला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

फैजलपुरियाबद्दल बोलायचे झाले तर ते प्रसिद्ध गायक आहेत. ‘कपूर अँड सन्स’ या बॉलिवूड सिनेमातील ‘लडकी ब्यूटीफुल कर गई चुल’ या गाण्यामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. ‘लडकी ब्यूटीफुल कर गई चुल’ तुफान गाजलं.. पण आता रेव्ह पार्टी, सापांसोबत व्हिडीओ आणि विष यामुळे फैजलपुरिया वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. (entertenment news)

फैजलपुरिया याचं करियर

फैजलपुरिया याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये गायकाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एवढंच नाही तर, लाल रंग, नानू की जानू आणि राजकुमार राव की शादी में जरूर आना यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये गायकाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *