धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही करू नये या वस्तूंची खरेदी

धनत्रयोदशी (Dhanteras 2023) हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशीचा 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी परंपरेने लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोकं आपली घरे स्वच्छ करतात आणि छान सजवतात. तसेच धन आणि संपत्तीच्या वाढीसाठी या दिवशी घरांमध्ये विशेष पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक विशेषत: सोन्या-चांदीचे दागिने, मूर्ती किंवा इतर वस्तू खरेदी (Purchase) करतात, कारण ते धनवृद्धीसाठी शुभ मानले जाते. या दिवशी खरेदीला खूप महत्त्व असले तरी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू नये अशा काही गोष्टी धर्मग्रंथांमध्ये सांगण्यात आल्या आहेत. जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तूंची खरेदी टाळावी

लोखंड
धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू घरी आणणे शुभ मानले जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडापासून बनवलेली कोणतीही वस्तू घरात आणल्यास घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते आणि त्याचे शुभ परिणाम मिळत नाहीत. तुम्हाला जर शनिची साडेसाती सुरू असेल तर लोखंडी वस्तू चुकूनही खरेदी (Purchase) करू नका.

अॅल्युमिनियम आणि स्टील
धनत्रयोदशीला अॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करू नका. असे मानले जाते की स्टील किंवा अॅल्युमिनियमची बनलेली भांडी किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये बरकत राहात नाही.

धनत्रयोदशीच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही प्लास्टिकची कोणतीही वस्तू घरी आणल्यास, यामुळे तुमच्या संपत्तीची स्थिरता आणि आशीर्वाद कमी होऊ शकतात.

काच
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर काचेच्या किंवा चिनी मातीच्या वस्तू अजिबात खरेदी करू नयेत. आरसा किंवा काच याचा थेट संबंध राहुशी असतो. राहू मानसीक समस्या निर्माण करतो. राहू घरामध्ये प्रवेश केल्यास प्रगती थांबते असे मानले जाते.

सिरेमिक वस्तू
ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी कोणीही सिरॅमिक किंवा बोन चायना वस्तू खरेदी करू नये. या गोष्टी घरात बरकत येण्यास बाधा आणतात. या दिवशी तांबे, पितळ, सोनं आणि चांदी यांची खरेदी करणं योग्य असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *