श्री गुरुदत्त शुगर्स लि. कडून ऊसतोड कामगारांना दिवाळीचे फराळ वाटप

पत्रकार – नामदेव निर्मळे :
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व शेतकरी हित केद्रस्थानी ठेऊन काम करणारा श्री गुरुदत्त शुगर्स लि. टाकळीवाडी यांच्याकडून ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळाच वाटप करण्यात आल. सध्या हंगामाचे दिवस असल्यामुळे त्यांना आपल्या घरी दिवाळी साजरा करता येत नसल्याने त्यांची दिवाळी गुरुदत्त शुगर्स ने गोड करून खऱ्याखुऱ्या माणूसकिचे दर्शन घडवले आहे .
ऊसतोड कामगारांना नेहमी श्री गुरुदत्त साखर कारखाना सहकार्य करत असतो. कशाचेही कमतरता न भासता सर्व सुख सुविधा त्यांना पुरवल्या जातात. ऊसतोड मजूर यांच सुद्धा मोलाच योगदान आहे. ऊसतोड कामगार स्वतः सांगतात आम्हाला कशाची कमतरता श्री गुरुदत्त ने कमी पडू दिलेली नाही. लहान बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ऊसतोड मजुरांना शुद्ध पाणी ,खर्चासाठी पाणी, दवाखाना ,या सह सर्व सुख सुविधा देण्यात आलेले आहेत. यातच खरा श्री गुरुदत्त साखर कारखान्याचा अभिमान आहे. (local news)