Bigg Boss 17 : बेडरुममध्ये समर्थने ईशासोबत हद्दच केली पार
(entertenment news) ‘बिग बॉस 17’ या शोमध्ये दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतोय. समर्थ जुरेल याने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली. समर्थ बिग बॉसच्या घरात आल्यापासून ड्रामाला आणखी तडका मिळाला आहे. बिग बॉसने समर्थची ओळख ही अभिनेत्री ईशा मालवीयचा बॉयफ्रेंड म्हणून केली. त्यामुळे त्याच्या एण्ट्रीपासूनच बिग बॉसमध्ये नवीन ट्विस्ट आला. सुरुवातीला ईशाने समर्थसोबतचं नातं फेटाळलं होतं. मात्र त्याला डेट करत असल्याचं नंतर तिने स्पष्ट केलं. तेव्हापासून बिग बॉसच्या घरात या दोघांमधील जवळीकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये समर्थ ईशाला किस करताना आणि तिच्यासोबत रोमँटिक होताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बिग बॉसच्या घरात रोमान्स पहायला मिळणं ही काही प्रेक्षकांसाठी नवीन गोष्ट नाही. मात्र समर्थने यावेळी हद्दच पार केली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये समर्थ त्याची गर्लफ्रेंड ईशाला किस करताना दिसतोय. ईशाला तो कधी गालावर, कधी खांद्यावर तर कधी पोटावर किस करतो. यावर ईशाची काही खास प्रतिक्रिया दिसून येत नाही. नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट्स केले आहेत. ‘यांना लस्ट स्टोरीजमध्ये पाठवा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘या दोघांना बिग बॉसच्या घराबाहेर काढा’, असंही दुसऱ्याने म्हटलंय. समर्थ आणि ईशाचा हा असा पहिलाच व्हिडीओ नाही, ज्यामध्ये दोघं रोमँटिक होताना दिसतायत. याआधीही दोघांचा बेडवर सोबत झोपल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.(entertenment news)
समर्थ आणि ईशा हे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. समर्थने जेव्हा बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली, तेव्हा ईशाने त्याला डेट करण्याच्या वृत्तावर नकार दिला होता. नंतर तिने समर्थचा बॉयफ्रेंड म्हणून स्वीकार केला. समर्थच्या आधी ईशा ही सहअभिनेता अभिषेक कुमारला डेट करत होती. उडारियाँ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. विशेष म्हणजे ईशाचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेकसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी आहे.
बिग बॉस या शोचं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. शनिवारच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये तो स्पर्धकांची चांगली शाळा घेतो. तर रविवारच्या एपिसोडमध्ये त्याचे भाऊ अरबाज खान आणि सोहैल खान मिळून सूत्रसंचालन करतात. 15 ऑक्टोबरपासून हा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.