संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे महाराष्ट्रात उडाली खळबळ

(political news) ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा कसिनोमध्ये जुगार खेळतानाचा हा कथित फोटो आहे. या एका फोटो मुळे महाराष्ट्र पेटलेला आहे. अशातच माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचा खळबळजनक दावा करत संजय राऊत यांनी बावनकुळे यांना इशारा दिला आहे. त्यांनी 3 तासांत 3.5 कोटी उडवले असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

…आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है… असं संजय राऊतांनी फोटो ट्विट करत म्हटलंय. राऊतांनी पुढे ट्विटमध्ये म्हटलंय…. मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण साडे तीन कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? दरम्यान हा फोटो खरा असेल तर त्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.

संजय राऊतांनी फोटो ट्विट केल्यानंतर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. आपण मकाऊमध्ये ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तिथला हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय.

तर संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर… असं म्हणत बावनकुळेंचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो भाजपनं ट्विट केलेत. (political news)

संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलीय. संजय राऊतांकडे आपले 25 लाख रूपये आहेत. आता त्यांनी त्या पैशातून स्वत:वर चांगले उपचार करवून घ्यावेत असंही कंबोज यांनी म्हंटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *