संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं; म्हणाले, वानखेडेवर मॅच झाली असती तर…

(political news) वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. या पराभवावर बोलताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झालं आहे. या देशांमध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजित होत असते. हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष, आणि आता हरलात ना? भारत संघ उत्तम खेळला हरले असले तरी त्यांचा अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

“वानखेडेवर मॅच झाली असती तर…”
नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये एका राज्याची राजकीय लॉबी घुसली आहे. मला क्रिकेटमधलं फारसं कळ नाही. पण वानखेडेवर मॅच झाली असती तर ही मॅच आपण जिंकलो असतो, असं जाणकार सांगतात. वल्लभाई पटेल स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवलं गेलं आहे. सामना या ठिकाणी ठेवला भारतीय पक्ष सर्व आपल्याकडे श्रय घेण्याचा विचार होता. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता. मात्र ज्या पद्धतीने राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरलं, असं संजय राऊत म्हणालेत.

“कपिल देव यांना आमंत्रण का नाही?”
सर्वप्रथम देशाला विश्वचषक मिळून दिला कपिल देव आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही.कपिल देवच तिथे आगमन झालं असतं इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं याला म्हणतात राजकारण… पडद्या मागचे राजकारण काल झालं भविष्यात त्याचं नक्कीच चर्चा होणार आहे. क्रिकेटची पंढरी मुंबई मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचे. पैसा घेऊन जायचा. कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायच्या आणि क्रिकेट देखील घेऊन जायचं हा यांचा डाव आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केलीय. (political news)

शिवतीर्थवरील राड्यावर म्हणाले…
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला झालेल्या राड्यावरही राऊतांनी भाष्य केलं. सुरुवात कोणी केली त्यांच्यावरती नोटीस कारवाई का केली नाही? मुंब्रा शाखेवरती ज्यांनी बुलडोजर चढवला त्याच्यावरती कारवाई का केली गेली नाही ? स्मृतीस्थळ शिवसेनाप्रमुखांच्या गद्दार आणि बेमान लोकांनी पाय ठेवू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. गद्दाराणा तुडवा म्हणून आपण स्वतःला शिवसैनिक समजतात मग आमच्या लोकांनी तुडवण्याचा प्रयन्त केला असेल तर कशाला गुन्हे दाखल करत आहेत, असं राऊत म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *