हार्दिकनंतर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची लागणार वर्णी?

(sports news) हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स सोडून या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावापूर्वी ‘ट्रेडिंग’मध्ये मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सामील होऊ शकतो.हार्दिक आयपीएलचे 7 सिझन आयपीएलमध्ये मुंबईसाठी खेळला आणि 2022 च्या सिझनपूर्वी ‘रिलीज’ झाला.

गुजरात टायटन्समध्ये सामील झाल्यानंतर, हार्दिकने या नवीन आयपीएल टीमला टी-20 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दोनवेळा नेलं. मात्र आता हार्दिक पांड्या टीमतून बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्सची धुरा कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हार्दिक पांड्या आणि गुजरात टायटन्सच्या मॅनेजमेंटमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी होऊ शकते.

हार्दिक पांड्या मुंबई टीममध्ये आल्यास MI ची ताकत नक्कीच वाढेल. हार्दिकनंतर गुजरात केन विलियम्सनला कर्णधार बनवलं जाऊ शकते.याशिवाय राशिद खानही कर्णधार होण्याच्या शर्यतीत सामील होऊ शकतो. (sports news)

हार्दिक पांड्याचा उत्तराधिकारी म्हणून शुभमन गिलच्या नावाचा विचार होऊ शकतो. मागच्या वर्षभरापासून शुभमन गिलच्या कामगिरीत सातत्य आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *