‘देशी टारझन’ संजयसिंह येणार वारणेच्या मैदानात
हरियाणातील गो भक्त आणि देशी टारझन म्हणून ख्याती असलेला जागतिक विक्रमवीर संजयसिंह वारणानगर येथे उद्या (बुधवारी) होणार्या आंतरराष्ट्रीय कुस्ती (wrestling) महासंग्रामसाठी येणार असल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
संजयसिंह याने 1 तासाला 10 हजार सपाट्या मारण्याचा विक्रम केला होता. वारणेच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती (wrestling) मैदानात प्रमुख किताबाच्या लढती सुरू होण्यापूर्वी संजयसिंह हे दहा मिनिटे सपाट्या मारण्याचे प्रात्यक्षिक करणार आहेत. त्यानंतर दंडबैठक, पुशअप्स आदी प्रकारच्या कसरतीही दाखवणार आहेत.