आता भारतात देखील उपलब्ध होणार इलॉन मस्कचा ‘ग्रॉक’ एआय चॅटबॉट

चॅटजीपीटी लाँच झाल्यापासून सगळीकडे एआयची चर्चा सुरू आहे. ओपन एआयनंतर कित्येक मोठमोठ्या टेक कंपन्यांनी स्वतःचे एआय टूल्स किंवा चॅटबॉट्स लाँच (launch) केले आहेत. यातच इलॉन मस्कच्या एक्स एआय या कंपनीने देखील आपला ‘ग्रॉक’ हा चॅटबॉट लाँच केला होता. आता हा चॅटबॉट भारतात देखील उपलब्ध झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच मस्कने Grok AI चॅटबॉटचं अधिकृत लाँचिंग केलं होतं. हा चॅटबॉट चॅटजीपीटी आणि गुगल बार्डला टक्कर देत आहे. विशेष म्हणजे या चॅटबॉटची उत्तर देण्याची पद्धत अगदीच खास आहे. सध्या केवळ एक्सचं (ट्विटर) सबस्क्रिप्शन असणाऱ्या यूजर्सनाच या चॅटबॉटचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

कित्येक देशांमध्ये उपलब्ध

सुरुवातीला केवळ अमेरिकेत लाँच (launch) करण्यात आलेला हा एआय चॅटबॉट आता कित्येक देशांमध्ये उपलब्ध झाला आहे. एक्स प्रीमियम+ प्लॅन सबस्क्राईबर असणाऱ्या यूजर्सना याचा अ‍ॅक्सेस मिळत आहे. एक्सच्या या प्रीमियम+ प्लॅनची किंमत 13,600 रुपये प्रतिवर्ष किंवा 1,300 रुपये प्रति महिना अशी आहे.

विनोदबुद्धी असलेला चॅटबॉट

ग्रॉकची सर्वात मोठी खासियत म्हणजे, हा एक विनोदबुद्धी असलेला चॅटबॉट आहे. हा आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची सार्कास्टिक पद्धतीने उत्तरं देतो. एका यूजरने जेव्हा त्याला कोकेन तयार करण्याची पद्धत विचारली, तेव्हा ग्रॉकने त्याला केमिकल सायन्समध्ये डिग्री घेण्यास सांगितलं, आणि अटक होण्याची तयारी ठेवा असा टोलाही लगावला. इतर चॅटबॉट मात्र अशा वेळी मी याबाबत माहिती देऊ शकत नाही, असं साधं उत्तर देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *