टॅक्समध्ये होणार मोठी बचत! पगारात जोडा फक्त ‘हे’ पाच भत्ते
आयकर रिटर्न्स (income tax) दाखल करताना प्रत्येक व्यक्ती कर कसा वाचवायचा याबाबत विचार करतो. पण पहिले समजून घ्या की एका दिवसात कर (टॅक्स) बचत करता येत नाही आणि यासाठी तुम्हाला वर्ष सुरू होताच कर नियोजन सुरू करावे लागते. तुमच्या उत्पन्नातील कर वाचवण्यात सर्वात मोठे योगदान म्हणजे सर्व भत्ते, जे करमुक्त असतात आणि तुमचे पैसे वाचतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नोकरीत रुजू होता तेव्हाच तुमच्या पगारात सर्व भत्ते समाविष्ट करा, जेणेकरून तुम्हाला याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.
लक्षात घ्या की नोकरीत असतानाही तुम्ही तुमच्या पगारात मध्येच बदल करूनही भत्त्यांचा लाभ घेऊ शकता. आज आपण अशाच पाच भत्त्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या पगारात समाविष्ट केल्यावर तुमचे खूप पैसे वाचतील.
खरेदी- घरातील उत्पादनांवर क्लीयरन्स विक्री – 80% पर्यंत सूट मिळवा.
घरभाडे भत्ता
बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता जोडून पॅकेज ऑफर करतात, ज्यात तुमच्या मूळ पगाराच्या ४०-५०% समावेश होतो. तुम्हाला तुमच्या कंपनीकडून घरभाडे भत्ता मिळत नसेल, तर ताबडतोब एचआरशी बोला आणि कर वाचवण्यासाठी तुमच्या पगारात त्याचा समावेश करा.
ट्रॅव्हल किंवा वाहतूक भत्ता
कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून रजा प्रवास भत्ता (LTA) देखील दिला जातो ज्याचा फायदा तुम्ही ITR (income tax) भरताना घेऊ शकता. हा भत्ता तुमच्या सेवेदरम्यान कुठेतरी प्रवास करण्यासाठी दिला जातो. तुम्ही चार वर्षांतून दोनदा लांब दौऱ्यावर जाऊ शकता. तुम्ही या टूरच्या संपूर्ण खर्चावर मर्यादेपर्यंत कर सवलत मिळवू शकता जी तुमच्या LTA एवढी असू शकते. तुम्ही कंपनी HR शी बोलून तुमच्या पगारात ट्रॅव्हल भत्ता मिळवू शकता.
अन्न (फूड) कूपन
अनेक कंपन्या फूड कूपन किंवा मील व्हाउचर किंवा SODEXO कूपनही देतात जे खाण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामध्ये दररोज १०० रुपयांपर्यंतचे कूपनचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळतो. काही कंपन्या पेटीएम फूड वॉलेटमध्येही जमा करत आहेत. कंपनी दिवसातून दोनदा ५० रुपये प्रति जेवण दराने १०० रुपये देते. अशा प्रकारे तुम्हाला २६,४०० रुपये नफा मिळू शकतो.
वैद्यकीय भत्ता
काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ताही देतात ज्याअंतर्गत कर्मचारी त्याच्या किंवा कुटुंबाच्या वैद्यकीय खर्च रीएम्बर्स करू शकतो. त्यामुळे जर हा भत्ता तुमच्या पगारात नसेल तर ते करून घ्या कारण ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. यामुळे करही वाचेल आणि कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहील.
कार देखभाल भत्ता
यामध्ये कर्मचाऱ्याला गाडीची देखभाल, पेट्रोल-डिझेलचा खर्च आणि ड्रायव्हरचा पगार दिला जातो. यामध्ये तुम्ही दर महिन्याला कर सूटचा दावा करू शकता. हे रीएम्बर्स म्हणूनही घेतले जाऊ शकते. या भत्त्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या अतिरिक्त पगारावरील काही कर वाचवण्याची संधी मिळते.