“त्यांची आमच्यासोबत बसण्याची औकात नाही
(political news) पुढच्यावर्षी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाची Hattrick करण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आला आहे. काँग्रेस मोठा पक्ष आहे. विरोधकांनी आपल्या आघाडीला INDIA नाव दिलय. सर्व विरोधक भाजपाला हरवण्याची प्लानिंग करत आहेत. पण त्याचवेळी विरोधी पक्षांमध्ये आपसातही जमत नाहीय. पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि डाव्या पक्षामध्ये परस्पर विरोधाचे सूर तीव्र होऊ लागले आहेत. सीपीआय (एम) वर टीएमसी नेते कुणाल घोष यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. बंगालमध्ये ‘लेफ्ट’ नाहीय. लेफ्ट पार्टीच्या लोकांची TMC सोबत बसण्याची औकात नाहीय, असं ते म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयासंबंधी कृणाल घोष म्हणाले की, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितलय की, इंडिया आघाडी देशामध्ये लढेल आणि टीएमसी बंगालमध्ये भाजपाविरोधी अभियानाच नेतृत्व करेल. आम्ही 2021 मध्ये भाजपाला हरवलं. सीपीआय (एम) आणि काँग्रेसला शुन्य जागा मिळाल्या. त्यांनी भाजपाच्या फायद्यासाठी मतविभाजन केलं. जागा वाटपासंबंधी ममता बॅनर्जी अंतिम निर्णय घेतील. इथे कुठला लेफ्ट पक्ष नाहीय” “लेफ्टच्या लोकांची टीएमसीसोबत बसण्याची औकात नाहीय” असं कृणाल घोष एएनआयशी बोलताना म्हणाले.
इंडिया आघाडीतच एक वाक्यता नाही
शुक्रवारी दिल्लीत जेडीयूची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची सर्वसम्मतीने जनता दल यूनायटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजीव रंजन (ललन) सिंह यांच्या राजीनाम्यानंतर सीएम नितीश कुमार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. जेडीयूचे काही सदस्य कॉन्स्टिट्यूशन क्लब बाहेर घोषणाबाजी करत होते, ‘देशाचा पंतप्रधान नितीश कुमार यांच्यासारखा असावा’ नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच नेतृत्व कराव अशी जेडीयू नेत्यांची इच्छा आहे. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी सार्वजनिक ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना संभाव्य पीएम उमेदवार म्हणून घोषित केलय. त्यामुळे इंडिया आघाडीतच एक वाक्यता नसल्याच दिसतय. (political news)