विराट कोहली सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार!

(sports news) 2023 या वर्षाच्या शेवटी विराट कोहलीने अर्धशतक झळकावत निरोप दिला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने 82 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. यासह त्याने 2023 वर्षात दोन हजार धावांचा टप्पा ओलांडला आणि कुमार संगकाराचा विक्रम मोडीत काढला. आता नववर्षाच्या सुरुवातीला एका विक्रमाच्या वेशीवर आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटची बॅट तळपली तर हा विक्रम त्याच्या नावावर होईल.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने SENA (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या संघांविरुद्ध सर्वाधिका 50 हून अधिक धावा केल्या आहेत. या देशांविरुद्ध सचिनने 74 वेळा 50 प्लस धावा केल्या आहेत. आता हाच विक्रम विराटच्या रडारवर आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. SENA देशांविरोधात 50 प्लस धावा करण्याची त्याची 73 वी वेळ होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत बरोबरी किंवा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

कसोटीच्या दोन डावात 50 हून अधिक धावा करण्यात यश आल्यास हा विक्रम त्याच्या नावावर होईल. जर दुसऱ्या कसोटीत फेल ठरला तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ही कसर भरून काढता येईल. (sports news)

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या सामन्यात दोन डावात त्याला आपल्या फलंदाजाची जादू दाखवावी लागेल. दुसरीकडे, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागेल. हा सामना गमावला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित बिघडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *