शॉपिंग मॉलमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार
(crime news) उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पोलिसांनी २६ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. परंतु, मुख्य आरोपीसह दोन अद्याप फरार आहेत. एका शॉपिंग मॉलमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. यामुळे नोएडामध्ये खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी नराधमांनी तरुणीवर बलात्कार केला होता. परंतु, तरुणीने भीतीने याची माहिती कोणाला दिली नव्हती. आरोपी तिला सारखे सारखे त्रास देऊ लागल्याने अखेर ३० डिसेंबरला तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
सेक्टर ३९ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर तपास करून तीन आरोपींना अटक करण्यात आली. राजकुमार, आझाद आणि विकास अशी तीन आरोपींची नावे आहेत. रवी आणि मेहमी हे दोघे फरार झाले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. (crime news)
आरोपी त्या भागातील कुख्यात गुंड असल्याने तरुणी सुरुवातीला घाबरली होती. त्यामुळे तिने तक्रार दिली नव्हती. परंतु, त्यांनी तरुणीला येता-जाता त्रास देण्यास सुरुवात केली होती. यामुळे तिने धाडस केल्याचे पोलिस म्हणाले. पीडितेचे मेडिकल झाल्यानंतर तिचा जबाब नोंदविण्यात आला आहे.