पौष्टिक चिजी मटार कबाब
थंडीच्या दिवसांमध्ये येणाऱ्या हिरव्यागार मटारांचा वापर आपण पुलाव, उसळ, भाजी असे पदार्थ बनवण्यासाठी करत असतो. त्यासोबतच कधी काही चटपटीत असे खावेसे वाटत असेल; तर फार-फार हराभरा कबाब बनवून त्यामध्येही मटार वापरले जातात. मात्र आपला आहार/डाएट न सोडता जर पौष्टिक आणि प्रथिनयुक्त काही खायचे असेल तर काय बरं खावे? असा प्रश्न अनेकांना, खासकरून व्यायाम आणि वजन कमी करणाऱ्यांना पडतो.
एका कबाबमधून तुम्हाला ४ ग्रॅम इतक्या भरपूर प्रमाणात प्रथिने मिळण्यासही मदत होईल. त्यामुळे तुमचा आहार सांभाळत, पौष्टिक, चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोप्या अशा मटार कबाबची काय रेसिपी आहे, पाहा
साहित्य
२ लहान चमचे tsp तेल
५-६ लसूण पाकळ्या
१ लहान चमचा tsp किसलेले आलं
२ हिरव्या मिरच्या (chili)
१ माध्यम आकाराचा कांदा
१ कप पालक [चिरलेला]
१ बाउल हिरवे मटार
१/२ कप चणा डाळ [भिजवून शिजवलेली]
१/२ लहान चमचा tsp गरम मसाला
१/२ लहान चमचा tsp कसुरी मेथी
मीठ
मिरपूड
तूप
चीज स्लाइस [चार कबाबसाठी १ स्लाइस]
कृती
सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये, थोडे तेल घालून घ्या.
तेल तापल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरची (chili), कांदा, पालक, हिरवे मटार, शिजवलेली चणा डाळ आणि थोडा गरम मसाला घालून सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून शिजवून घ्यावे.
आता तयार भाज्यांचे मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची एक पेस्ट बनवून घ्या.
पुन्हा कढईमध्ये भाज्यांची तयार केलेली पेस्ट मीठ आणि मिरपूड घालून शिजवून घ्यावी. शेवटी यामध्ये चवीसाठी थोडी कसुरी मेथी घालावी.
नंतर, तयार कबाब मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करताना यात थोडे चीज घालून गोळ्यांना, हातावर हलके चपटे करून त्यांना कबाबचा आकार द्यावा.
एक पॅन किंवा तवा घेऊन, त्यावर थोडेसे तूप पसरवून तयार कबाबचे गोळे सोनेरी होईपर्यंत खरपूस परतून घ्या.
तयार आहेत आपले प्रथिनयुक्त असे पौष्टिक मटार कबाब. हे कबाब तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता.
तुपामध्ये हे कबाब परतल्यामुळे याची चव वाढण्यास मदत होते.