एलआयसीची नवीन भन्नाट पॉलिसी; विम्यासोबत मिळणार ‘हा’ फायदा

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC वेळोवेळी आपल्या करोडो ग्राहकांसाठी नवनवीन योजना (scheme) जाहीर करते. या मालिकेत अलीकडेच LIC ने नवीन युनिट लिंक्ड जीवन विमा उत्पादन, एलआयसी इंडेक्स प्लस योजना लाँच करण्याची घोषणा केली जी शेअर बाजार, विमा संरक्षण आणि हमी एडिशनचे फायदे उपलब्ध करून देते. भारतीय आयुर्विमा महामंडळाने सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी नवीन योजना सुरू केली, जी ६ फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली.

एलआयसीची नवीन योजना नियमित प्रीमियमसह युनिट-लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. एलआयसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, योजना (scheme) पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत जीवन विमा संरक्षणासह बचत करण्याची सुविधा देते.

एलआयसीच्या नव्या योजनेची वैशिष्ट्ये

एलआयसी इंडेक्स प्लस एक युनिट लिंक्ड योजना असून यामध्ये बचत आणि विमा दोन्हीचा लाभ मिळेल. २,५०० रुपयांच्या किमान प्रीमियमपासून गुंतवणुकीची सुरुवात केली जाऊ शकते. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय ९० दिवस आणि कमाल वय ५० किंवा ६० वर्षे ठेवण्यात आले आहे जे मूळ विम्याच्या आधारावर ठरवले जाते. या प्लॅन अंतर्गत निफ्टी १०० आणि निफ्टी ५० शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाईल.

विमा अन् गुंतवणुकीची संधी

एलआयसी इंडेक्स प्लस प्लॅनमध्ये जोपर्यंत पॉलिसी लागू (कालावधी) आहे तोपर्यंत गुंतवणूकदाराला विमा आणि गुंतवणुकीची संधी मिळेल. युनिट लिंक्ड स्कीम असल्याने फ्लेक्सी ग्रोथ फंड आणि फ्लेक्सी स्मार्ट ग्रोथ फंड सारखे पर्याय देखील उपलब्ध असून योजनेच्या मॅच्युरिटीसाठी तुमचे वय १८ वर्षे ते ७५ आणि ८५ वर्षे दरम्यान असले पाहिजे.

जोखीम संरक्षण किती?

मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये रिस्क कव्हर वार्षिक प्रीमियमच्या ७ ते १० पट असेल. एलआयसीने म्हटले की दर पाच वर्षांनी योजनेत हमीभाव वाढेल. दरम्यान,पॉलिसीमध्ये लॉक इन पीरियड पाच वर्षांचा ठेवण्यात आला असून त्यानंतर लोक आंशिक पैसे काढू शकतात. पॉलिसीमध्ये किमान १० तर कमाल २५ वर्षासाठी गुंतवणूक करू शकता आणि योजना कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

गुंतवणुकीचा कालावधी

५० किंवा त्याहून अधिक वयाच्या गुंतवणुकीवर प्रीमियम विम्याच्या रकमेच्या ७ पट असेल. तर या पॉलिसीची किमान मुदत १० ते १५ वर्षे असेल आणि जास्तीत जास्त २५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. लक्षात घ्या की प्रीमियमवर कमाल मर्यादा नाही मात्र, वार्षिक प्रीमियम ३० हजार रुपये, सहामाही प्रीमियम १५ हजार, त्रैमासिक प्रीमियम ७,५०० रुपये आणि मासिक प्रीमियम २,५०० रुपये असेल. विशेष म्हणजे वार्षिक कमाल २.५० लाख रुपयांपर्यंत प्रीमियम करमुक्त असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *