जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सिद्राम कांबळे तर उपसभापती पदी दऱ्याप्पा सुतार

शिरोळ/प्रतिनिधी:

(local news) जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सिद्राम दत्तु कांबळे (रा. नांदणी) व उपसभापतीपदी दऱ्याप्पा बाबू सुतार (रा. दत्तवाड) यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीच्या सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती व उपसभापती पदासाठी विशेष सभा झाली. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल नादरे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी सभापती पदासाठी सिद्राम कांबळे यांचे नाव सुभाषसिंग रजपूत यांनी सुचविले व किरण गुरव यांनी अनुमोदन दिले. तर उपसभापती पदाकरिता दऱ्याप्पा सुतार यांचे नाव शिवाजी चव्हाण यांनी सुचविले, त्यास महावीर पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी सभापती पदासाठी सिद्राम कांबळे व उपसभापती पदाकरिता दऱ्याप्पा सुतार यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल नादरे यांनी जाहिर केले.

नुतन सभापती सिद्राम कांबळे व उपसभापती दऱ्याप्पा सुतार तसेच सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकारी अनिल नादरे यांचा सत्कार विविध संस्था तसेच बाजार समितीच्या वतीने करण्यात आला. तसेच मावळते सभापती सुभाषसिंग रजपूत व उपसभापती मुजमिल पठाण यांचाही सत्कार बाजार समितीच्यावतीने करण्यात आला. बाजार समितीमधील सर्व संचालक व कर्मचारी यांना बरोबर घेवून शेतकरी, व्यापारी यांचा विकास साधला जाईल, असे आश्वासन नूतन सभापती सिद्राम कांबळे यांनी दिले. बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख यांनी प्रास्ताविक केले व सुभाषसिंग रजपूत यांनी बाजार समितीच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन आभार मानले.

या निवड सभेस संचालक रामदास गावडे, शिवाजी चव्हाण, महावीर पाटील, सुरेश माणगांवे, सौ. दिपाली चौगुले, सौ. माधुरी सावगांवे, चंद्रकांत जोग, संजय अनुसे, आण्णासो पाणदारे, किरण गुरव, प्रविणकुमार बलदवा, दादासो ऐनापूरे, भगवान पाटील तसेच बाजार समितीचे सचिव सुनिल गावडे व कर्मचारी वर्ग यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते, संस्था पदाधिकारी उपस्थित होते. (local news)

जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सिद्राम कांबळे तर उपसभापती पदी दऱ्याप्पा सुतार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सिद्राम कांबळे हे गणपतराव पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्य आणि दलित कुटुंबातील व्यक्तीला बाजार समितीचे सभापती करून एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा सन्मान केला असून सिद्राम कांबळे यांच्या निष्ठेचे हे फळ मिळाले असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

यावेळी कारखाना संचालक शेखर पाटील, रघुनाथ म्हेत्रे, बापूसाहेब परीट, शंकर कांबळे, महेश परीट, ग्रा. पं. सदस्य दीपक कांबळे, शितल उपाध्ये, किरण वठारे, संजय अनुसे, संजय गुरव, संजय सुतार, संजय मगदूम, आशिष कुरणे, राहूल शिंगे, उमेश कामत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *